Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त; रेंजहिल्स परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. रेंजहिल्स परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 12:29 PM
तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त; रेंजहिल्स परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त; रेंजहिल्स परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त
  • रेंजहील परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
  • खडकी पोलिसांनी सापळा रचून पकडले
पुणे : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. रेंजहिल्स परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून गांजा, महागडा मोबाइल संच असा दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत नीरज मलिक (वय २८, रा. सिद्धीविनायक सोसायटी, एनडीए रस्ता, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (१३ जून) मध्यरात्री पोलिसांचे पथक रेंजहिल्स परिसरात गस्त घालत होते. तेथील फुटबॉल मैदानाजवळ नीरज मलिक पिशवी घेऊन थांबला होता. पोलिसांना पाहताच मलिक तेथून गडबडीत निघाला. पोलिसांना संशय आल्याने मलिक याची चौकशी केली. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. मलिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मलिक मूळचा जळगावचा रहिवासी आहे. त्याने गांजा कुठून आणला, तसेच तो कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

गांजा बाळगणारा अल्पवयीन ताब्यात

गांजा बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाला नांदेड सिटी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून एक किलो ६४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेला १५ वर्षीय मुलगा मूळचा बीडमधील आनंदनगरचा रहिवासी आहे. याबाबत पोलिस हवालदार संग्राम शिनगारे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धायरीतील बारंगणी मळा रस्त्यावर ११ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या अल्पवयीन थांबला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. गांजाची किंमत ३० हजार रुपये आहे. त्याच्याकडून गांजा, पिशवी, तसेच मोबाइल संच जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

Web Title: Pune police have arrested a young man for selling cannabis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Drugs News

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
1

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
2

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.