Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आता सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी काढला तोडगा

सायबर गुन्ह्यांत प्रचंड वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान लक्षात घेऊन नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही सायबर लॅब सुरू केले जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2025 | 12:30 AM
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आता सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी काढला तोडगा

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आता सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी काढला तोडगा

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : सायबर गुन्ह्यांत प्रचंड वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान लक्षात घेऊन नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही सायबर लॅब सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असून, गृहविभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

पुणे शहरातील वार्षिक गुन्ह्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. तेव्हा गंभीर गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यात मात्र प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात जवळपास ३६ हजारहून अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यातून पुणेकरांची जवळपास साडे सहाशे कोटींची फसवणूक झाली आहे. दरवर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे. परंतु, त्याप्रमाणात गुन्हे उघडकीस येत नसल्याचे दिसते.

दरम्यान, सायबर पोलिसांत असलेले कमी मनुष्यबळ, अत्याधुनिक साधणे तसेच कुशल मनुष्यबळाची चणचण यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुण्यातही सायबर लॅब सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढते सायबर गुन्हे व पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशपातळीवरील तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्ह्यांत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. चोरट्यांचा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईसह परिसरातील सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी नवी मुंबईत सायबर लॅब सुरू केली आहे. नवी मुंबईप्रमाणे पुण्यातही सायबर लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याबाबत गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू आहे. सायबर पोलीस ठाणे निर्मिती करण्याबाबतही चाचपणी सुरू आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे, परंतु, आणखीही सायबर पोलीस ठाण्यांची गरज आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : सांगलीत चोरट्यांनी ड्रायफ्रूट्सचे दुकान फोडले, काजू, बदामावर मारला डल्ला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Web Title: Pune police to start cyber lab to arrest cyber criminals nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी
1

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
2

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप
3

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
4

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.