संग्रहित फोटो
सांगली : सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. सांगली येथील मार्केट यार्डातील ड्रायफ्रूट्सचे दुकान फोडून चोरट्यांनी आतील २ लाख ६३ हजार ८०० रुपयांचे काजू आणि बदाम यासह रोख ६ हजार रूपये लंपास केले. याबाबत फैसल फारुक सुतारिया (रा. सुंदरनगर, प्लॉट क्रमांक ६२, आनंद हाऊसिंगजवळ, मिरज ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी फैसल सुतारिया यांचे मार्केट यार्डातील गल्ली नंबर एक, प्लॉट नंबर ३३२ मध्ये सुलतान ट्रेडर्स मसाले आणि ड्रायफ्रूट्स हे दुकान आहे. दिनांक २० जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन रात्री ९.३० च्या सुमारास घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आतील ७० हजार २०० रुपयांच्या काजूच्या १० किलोच्या ९ पिशव्या घेतल्या. तसेच १ लाख ९३ हजार ६०० रुपयांच्या बदामाच्या २५ किलोच्या ११ पिशव्या घेतल्या. काऊंटरमधील रोख ६ हजार रुपयेही चोरले. चोरट्यांनी काजू, बदाम व रोकड असा २ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला.
हे सुद्धा वाचा : तासगावात जुगाराचा अड्डा उध्वस्त; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
सीसीटीव्हीत तिघे कैद
मंगळवारी (दि. २१) सकाळी दुकानात चोरी झाल्याचे फिर्यादी सुतारिया यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चोरीनंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तिघा चोरट्यांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी महिलेला डांबून ठेवलं अन्…
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.