Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

नावापुढे ‘डॉक्टर’ आणि क्लिनिकमध्ये सलाईन-इंजेक्शन्सचा साठा; मात्र वैद्यकीय पात्रतेची चौकशी होताच वेगळेच वास्तव समोर आले. वारजेतील गुरुकृपा क्लिनिकवर महापालिकेच्या अचानक कारवाईत कथित बोगस डॉक्टरचा प्रकार उघडकीस आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 02:42 PM
Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

Follow Us
Follow Us:
  • वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
  • ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त
  • महापालिकेचा क्लिनिकवर छापा
पुणे: वैध वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरांविरोधात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे. वारजे येथील गुरुकृपा क्लिनिकवर छापा टाकून महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. संबंधित व्यक्तीकडे केवळ नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र असतानाही ॲलोपॅथी उपचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव चव्हाण (रा. गुरुकृपा क्लिनिक, गोकुळनगर पठार, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महापालिकेच्या प्राथमिक तपासानुसार, चव्हाण याच्याकडे नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र आहे. मात्र, वैद्यकीय पात्रतेबाबत आवश्यक परवानगी नसतानाही तो नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी वापरत असल्याचा आणि रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करत असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Crime News: १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; खोलीत आढळलेल्या चिठ्ठीने तपासाला नवी दिशा,अभ्यासाचा ताण की… 

क्लिनिकची अचानक पाहणी

क्लिनिकमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचा संशय आल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी गणेश ढमाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान क्लिनिकमध्ये विविध वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा साठा आढळून आला. पथकाने क्लिनिकची झडती घेतली असता सलाईन, इंजेक्शन्स तसेच ॲलोपॅथी औषधांचा साठा आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. संबंधित व्यक्तीकडे ॲलोपॅथी उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय पात्रता नसल्याचे तपासात आढळल्यानंतर महापालिकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:Crime News: घटस्फोटाचे खोटे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण

खराडीतही कारवाई

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी खराडी परिसरातही अशाच प्रकारची कारवाई केली होती. बीएएमएसची पदवी पूर्ण झालेली नसतानाही एका तरुणाने नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावून क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार केल्याचा प्रकार त्यावेळी समोर आला होता. तपासात संबंधित तरुणाने दुसऱ्या व्यक्तीचा वैद्यकीय नोंदणी क्रमांक वापरल्याचेही समोर आल्याची माहिती महापालिकेने दिली होती. तसेच तो एका रुग्णालयातही प्रॅक्टिस करीत असल्याचे आढळून आले होते. शहरात वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून उपचार केले जात असल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यास त्याची पडताळणी करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू ठेवण्यात आली आहे.

Web Title: Pune warje fake doctor gurukrupa clinic pmc action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Bogus Doctor
  • Bogus Documents
  • Fraud Case
  • pune crime case

संबंधित बातम्या

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
1

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.