सौजन्य फोटो - AI Gemini
कालांतराने आरोपीच्या वर्तनाबाबत तरुणीला संशय येऊ लागला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जून २०२६ मध्ये तिने आरोपीसोबतची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर तिने आरोपीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतरही आरोपी तिच्या सलूनमध्ये वारंवार येत असल्याचा आरोप आहे. ‘माझे तुझ्यावरच प्रेम आहे,’ असे सांगून तो भावनिक दबाव आणत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीकडून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याने तरुणी त्रस्त झाली होती. दरम्यान, आपल्याशी लग्न करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी तरुणीने आरोपीकडे केली. मात्र, लग्नाचा विषय काढल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हेही वाचा:Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत
या प्रकारानंतर त्रस्त झालेल्या तरुणीने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी वनेश्वर फकीरराव पंडित याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, आरोपी आणि पीडितेच्या संपर्कातील पुरावे, घटनाक्रम तसेच इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलिस करीत आहेत.






