Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: वाद विकोपाला गेला अन्… प्रियकराने प्रेयसीचा घेतला जीव, गळफास घेत स्वतःलाही संपवलं

रायगडच्या रोहा तालुक्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 08:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधातील वादानंतर प्रेयसीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
  • प्रेयसीचा खून केल्यानंतर प्रियकराने गळफास घेतल्याची माहिती.
  • रोहा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. घडलेली घटना रोहा तालुक्यातील निडी गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार शाब्दिक वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काय घडलं नेमकं?

रोहित पाटील आणि तन्वी ताडकर असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केली. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर

या घटनेची माहिती माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू

रायगड येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जण जखमी आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारणे पाठीमागे धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशःचेंदामेंदा झाली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपुर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Indapur Crime : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्तींची नावे काय आहेत?

    Ans: रोहित पाटील आणि तन्वी ताडकर अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: पोलिसांनी पुढे काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Raigad crime dispute escalates lover kills girlfriend then ends his own life by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Police : पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती
1

Navi Mumbai Police : पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती

Nashik News: अशोक खरात प्रकरणात पत्नीच्याही अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलीस कोठडीची शक्यता
2

Nashik News: अशोक खरात प्रकरणात पत्नीच्याही अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलीस कोठडीची शक्यता

Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून
3

Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून

Odisa Crime: पंचायतीनंतरही शांत झाला नाही राग; मित्राची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह; आरोपीला मुंबईतून अटक
4

Odisa Crime: पंचायतीनंतरही शांत झाला नाही राग; मित्राची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह; आरोपीला मुंबईतून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.