Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: खेडमध्ये भीषण आग; गोठ्यातील 25 मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकावर दुःखाचा डोंगर

खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे पहाटे लागलेल्या भीषण आगीत २५ मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे जिवंत जळाली. अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 11:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोठ्याला लागलेल्या आगीत २५ जनावरांचा मृत्यू झाला.
  • अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आणखी पसरण्यापासून रोखली गेली.
  • पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रत्नागिरी: खेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत २५ मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Ratnagiri News)

काय घडलं नेमकं?

गुरुवारी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याचे समोर आले आहे. गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. (Ratnagiri News) त्यामुळे या आगीत २५ मुख्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाच्या अथक प्रयत्ननानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (Ratnagiri News)

Ambernath Crime: दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल

या दुर्घटनेत पशुपालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे जिवंत जळून मृत्युमुखी पडली, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. ही आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरु आहे. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ratnagiri News)

गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखा साठा? खेडमध्ये कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ

राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक व वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी परिसरातील एका गोदामामध्ये लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवण्यात आला असून, रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून त्याचे विविध भागांत वितरण केले जात असल्याचे कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा आणि वितरण सुरू असल्याच्या आरोपांमुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ahilyanagar Crime: प्रेयसीचा खून करून दोन दिवस मृतदेह घरात लपवला, नंतर जंगलात जाळला; थरारक हत्याकांड

💡

Frequently Asked Questions

  • Que: या आगीत किती जनावरांचा मृत्यू झाला?

    Ans: १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा मृत्यू झाला.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे ही घटना घडली.

  • Que: आगीनंतर कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली असून आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Ratnagiri news massive fire in khed 25 voiceless animals perish in a cowshed livestock owner devastated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.