काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव शुभम सुखदेव ओहळ (वय २४) असे आहे. शुभम आणि या प्रकरणातील मृत मुलीचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहत होते. मात्र शुभम तिच्यावर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. घटनेच्या रात्री देखील याच कारणावरून त्यांच्यात तीव्र भांडण झाल. या भांडणात शुभमने रागाच्या भरात लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने मुलीच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की त्या अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यांनंतर शुभम घाबरला त्याने मुलीचा मृतदेह एका गादीत गुंडाळला आणि दोन दिवस घरातच लपवून ठेवला. यानंतर तो घराला कुलूप लावून नगरला पळून गेला. तिथून तो आपल्या वडिलांना सोबत घेऊन परत आला. दोघांनी मध्यरात्रीपर्यंत योग्य संधीची वाट पाहिली आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल ओतून पेटवून दिला. प्रचंड घाबरलेल्या शुभमने अहिल्यानगरातील आपल्या एका मित्राला फोन केला आणि “मी माझ्या बायकोला मारून टाकले,” अशी कबुली दिली. आपणही या गुन्ह्यात अडकू या भीतीने त्या मित्राने तात्काळ कोतवाली पोलिसांना फोन करून ही माहिती दिली.
आरोपी अटकेत
पोलिसांना माहिती मिळताच आरोपींच्या संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून पोलिसांनी मुख्य आरोपींना घरातूनच ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम सुखदेव ओहळ (वय २४) आणि वडील सुखदेव ओहळ असे आहे. या प्रकरणात एकूण ३ संशयितांवर खून आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून कारवाई सुरु आहे.
Ans: चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: त्याने मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला.
Ans: आरोपीने मित्राला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. मित्राने पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.






