Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले

सहारनपूरमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशोक राठोड यांच्यासह त्यांच्या पत्नी, आई आणि दोन मुलांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ३ पिस्तुलं जप्त केली असून तपास सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 20, 2026 | 09:01 PM
५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले (Photo Credit- X)

५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सहारनपूरमध्ये रक्ताचा थरार!
  • एकाच कुटुंबातील ५ जणांचा गोळ्या झाडून अंत
  • घरात ३ पिस्तुलं अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
Five Dead Bodies in Room: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील सारसावा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कौशिक बिहार कॉलनीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. एकाच घरातील पाच सदस्यांचा गोळ्या झाडून अंत झाल्याने सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मंगळवारी सकाळी कौशिक बिहार कॉलनीतील एका घरातून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर आणि घरातून कोणाचीही हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता त्यांना पाच जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. मृतांची ओळख अशोक राठोड (४०), त्यांची पत्नी अंजिता (३७), आई विद्यावती (७०) आणि दोन मुले कार्तिक (१६) व देव (१३) अशी झाली आहे.

घटनेचे भीषण स्वरूप

प्राथमिक तपासानुसार, कुटुंबातील आई आणि दोन मुले एकाच खोलीत वेगवेगळ्या बेडवर मृतावस्थेत आढळले. अशोक राठोड यांचा मृतदेह घराच्या बाहेरील भागात (पासीघाट जवळ) सापडला, तर त्यांची पत्नी अंजिता यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या भागात रक्ताच्या थारोळ्यात होता.

#SaharanpurPolice#बाईट ➡️आज दिनांक 20.01.2026 को थाना सरसावा क्षेत्रान्तर्गत कौशिक विहार कॉलोनी में एक ही परिवार के 05 लोगों के शव मिलने की सूचना पर तत्काल थाना सरसावा पुलिस द्वारा घटनास्थल पर पहुँचकर शव को कब्जे में लिया गया एवं उच्चाधिकारीण द्वारा घटनास्थल का निरीक्षण किया… pic.twitter.com/c5jltWa85l — Saharanpur Police (@saharanpurpol) January 20, 2026

सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारणही समोर

धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही मुलांच्या कपाळावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अशोक यांच्या छातीत गोळी लागली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन पिस्तुलं जप्त केली आहेत. एकाच घरात तीन पिस्तुलं सापडल्याने ही घटना केवळ आत्महत्या नसून त्यामागे काही मोठे कारण असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

कोण होते अशोक राठोड?

अशोक राठोड हे सरकारी कर्मचारी होते. ते नाकुर तहसीलमध्ये ‘अमीन’ या पदावर कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली होती. त्यांचा मोठा मुलगा कार्तिक दहावीत, तर धाकटा मुलगा देव नववीत शिक्षण घेत होता. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब अत्यंत साधे आणि शांत होते, त्यामुळे त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत सर्वजण संभ्रमात आहेत.

पोलिसांचा तपास आणि संशय

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक राठोड यांनी आधी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी. मात्र, घरात तीन पिस्तुलं सापडल्याने पोलीस ‘मर्डर’ आणि ‘सुसाईड’ अशा दोन्ही कोनातून तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच डीआयजी, एसएसपी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी घर सील केले असून घरातील सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. मोबाईलच्या कॉल रेकॉर्ड्सवरून काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.

शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूची नेमकी वेळ आणि क्रम (कोणाचा मृत्यू आधी झाला) स्पष्ट होईल. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शेजाऱ्यांच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येईल. एकाच वेळी एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने सहारनपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Saharanpur crime 5 family members found dead 3 pistols recovered crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • crime news
  • Murder
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारणही समोर
1

सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारणही समोर

राष्ट्रपतींनाही शंकराचार्य नियुक्तीचा अधिकार नाही; नोटीस मिळाल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांचा उडाला भडाका
2

राष्ट्रपतींनाही शंकराचार्य नियुक्तीचा अधिकार नाही; नोटीस मिळाल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांचा उडाला भडाका

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई
4

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.