Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यवधींचे चंदन जप्त

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2025 | 01:11 PM
आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यवधींचे चंदन जप्त
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले १० ते १५ टन वजनी चंदन पकडले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले.

कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची तस्करी

पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस

या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून हे चंदन बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईला पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. या तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : दुचाकी वाहने चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल 14 दुचाकीसह एक सायकल जप्त

चंदनाच्या झाडांचा सुगंध आनंददायी

चंदनाचा वापर केवळ आयुर्वेदातच नाही धार्मिक विधींमध्येही केला जातो. कोणत्याही देवतेची पूजा चंदनाशिवाय पूर्ण होत नाही. पूजेसाठी लाल चंदन, पिवळे चंदन, पांढरे चंदन, हरिचंदन, गोपी चंदन इत्यादी चंदनाचे अनेक प्रकार आहेत. चंदनाच्या झाडांचा सुगंध आश्चर्यकारकपणे आनंददायी असतो, आणि त्यांच्या अद्वितीय गुणांपैकी एक म्हणजे ते हवेत सोडतात तो सुगंध अनेक पिढ्या टिकतो. चंदनाचा वापर पिढ्यानपिढ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करण्यासाठी घरगुती औषध म्हणून केला जात आहे आणि लाकूड आणि पाने या दोन्हीचे अनेक फायदे आहेत. चंदनाचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे आणि आजही त्याची उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

Web Title: Sandalwood worth crores of rupees has been seized on the pune mumbai expressway nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Police News
  • pune news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…
1

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ
3

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले
4

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.