Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: ‘तुला मुलगा होत नाही’ म्हणत टोमणे, मारहाण आणि छळ, तब्ब्ल ११ वर्ष विवाहितेने केलं सहन; तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू

सांगली जिल्ह्यातील आरती जाधव या विवाहितेचा सासरच्या छळामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मुलगा होत नाही’ आणि माहेरहून ५० तोळे सोने आणण्याच्या कारणावरून तिचा अकरा वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ होत होता. याप्रकरणी पतीसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहितेचा अकरा वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप.
  • ‘मुलगा होत नाही’ आणि सोने आणण्यावरून सासरच्यांकडून त्रास.
  • पती, सासूसह सहाजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी सातत्याने केलेल्या छळामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि माहेरहून ५० तोळे सोने आणण्यासाठी तिचा अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. आता तिचा तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनम येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव आरती जाधव (वय ३७) असे आहे. ती मूळची पलूस येथील रहिवासी आहे. आरती हिचा प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी विवाह झाला होता.विवाहानंतर आरती ही पतीसह तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे वास्तव्यास होती. या प्रकरणी आरतीच्या 74 वर्षीय वडील सुभाष कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

तब्ब्ल ११ वर्ष सहन केला छळ

फिर्यादीनुसार, फेब्रुवारी 2015 पासून ते 23 मे 2026 पर्यंत आरोपींकडून आरतीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. ‘तुला मुलगा होत नाही’ तसेच ‘माहेरहून सोने आण’ या कारणांवरून तिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. विशेषतः पती प्रशांत जाधव व सासू रूपा जाधव यांनी मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या फिर्यादीत आरतीच्या मृत्यूचे कारण हे तिला दिला जाणारा सततचा मानसिक व शारीरिक त्रास असे नमूद करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

तक्रारीनुसार प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव (दोघे रा. मंगरूळ ता. खानापूर, जि. सांगली) संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश जोतिराम साळुंखे, प्रतिक प्रकाश साळुंखे व शेजल प्रकाश साळुंखे (चौघे रा. येळावी ता. तासगांव जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या नागपट्टीनम येथे वास्तव्यास आहेत.

ई-साक्ष तंत्रज्ञानाचा वापर

हा गुन्हा 26 मे 2026 रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. फिर्यादी हे पलूस येथील रहिवासी असून तामिळनाडूमध्ये भाषेची अडचण व इतर कारणांमुळे तक्रार नोंदविण्यात अडचणी येत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो नागपट्टीनम सिटी पोलिसांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी ‘ई-साक्ष’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Pune Crime: त्याने वापर करून सोडलं’…, मेसेजनंतर आयटी तरुणीची मुठा नदीत उडी मारून आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरती जाधव यांचा छळ कोणत्या कारणांवरून केला जात होता?

    Ans: ‘मुलगा होत नाही’ तसेच माहेरहून ५० तोळे सोने आणण्याच्या कारणावरून तिचा छळ केला जात होता.

  • Que: या प्रकरणात किती जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पती, सासूसह एकूण सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांनी या तपासात कोणते तंत्रज्ञान वापरले?

    Ans: पोलिसांनी या प्रकरणात ‘ई-साक्ष’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Web Title: Sangli crime taunts beatings and harassmentyou cannot bear a sona married woman endured this ordeal for a staggering 11 years suspicious death reported in tamil nadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!
1

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
2

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.