Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मकोका; दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया, दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश

Sangli Crime News: सांगलीच्या कृष्णा घाट परिसरातील खूनप्रकरणात सक्रिय असलेल्या ‘आर.के. गँग’विरुद्ध मोठी कारवाई करत आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 08:34 PM
Sangrampur Fake Currency Notes

Sangrampur Fake Currency Notes

Follow Us
Follow Us:
  • कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मोक्का
  • दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया
  • दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश
सांगली : सांगली शहरातील कृष्णा घाट परिसरात झालेल्या खून प्रकरणी सक्रिय असलेल्या ‘आर.के. गँग’ टोळीतील दोन अल्पवयीनांसह आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही मंजुरी दिली.

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात ‘आर.के. गँग’ या संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग निष्पन्न झाला. टोळीचा प्रमुख राकेश शामराव कांबळे (वय ३१), लखन पंडित इसरडे (वय ३५), कृष्णा ऊर्फ मुद्दक्या कुटनाप्पा कांबळे (वय २५), करण किशोर शिंदे (वय २७), महेश विजय नाटेकर (वय १९), सुनील ऊर्फ मुक्या निलाप्पा खडते (वय ३८) तसेच दोन अल्पवयीनांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

या टोळीचे कार्यक्षेत्र सांगली शहर तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे तपासात समोर आले आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीत टोळीने सातत्याने विविध गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. वर्चस्व निर्माण करणे, आर्थिक फायदा मिळविणे आणि दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने टोळीने संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा आरोप आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, बेकायदा दारूविक्री, घातक शस्त्रे बाळगणे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्यांच्या माध्यमातून टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलम ३(१)(i), ३(१)(ii), ३(२), ३(४) आणि ४ अन्वये कारवाई करण्यासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावाचे अवलोकन करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी प्रस्तावाची छाननी केल्यानंतर दोन अल्पवयीनांसह आठ आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करून पुढील तपासास तातडीने मंजुरी दिली. यापूर्वी सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खूनप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’ टोळीवरही मोक्का कारवाईला मंजुरी देण्यात आली होती.संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा टोळ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सांगली शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधातील कारवाईला आणखी धार आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर अंकुश ठेवण्याचा पोलिसांचा इरादा स्पष्ट झाला आहे.

Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने चढला सरपंचाचा पारा अन्…., नेमका प्रकार काय?

Web Title: Sangli krishna ghat murder rk gang mcoca action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • MCOCA Action
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
2

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.