फोटो सौजन्य - सोशल मिडिया
T20 World Cup 2026: T20 World Cup 2026 ची सुरुवात धमाकेदार झाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी तीन मोठे सामने झाले. पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि भारताने आपापले सामने जिंकले. आता, सर्वांचे लक्ष सुपर संडेवर आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या T20 World Cup मध्ये एकूण तीन मोठे सामने होणार आहेत. चला या सामन्यांवर चर्चा करूया आणि ते कधी आणि किती वाजता लाईव्ह पाहता येतील ते जाणून घेऊया.
टी-२० विश्वचषकाचे तिन्ही सामने (Afghanistan vs New Zealand, England vs Nepal and Sri Lanka vs Ireland) हे वेगवेगळ्या वेळेवर सुरू होणार आहेत. आजचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड हा सामना 11 वाजता सुरू होणार आहे तर सामन्यांचे नाणेफेक हे 10.30 वाजता सुरू होईल. दुसरा सामना इंग्लड नेपाळ यांच्यामध्ये होणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार 3.00 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 2.30 वाजत होणार आहे.
T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर
आजचा तिसरा सामना हा श्रीलंका विरूद्ध आयर्लंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे या सामन्याचे नाणेफेक हे 6.30 वाजता हाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील. चाहते हे सामने जिओहॉटस्टारवर देखील स्ट्रीम करू शकतात.
ग्रुप डी मध्ये अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होईल. हा सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल. चेपॉकची खेळपट्टी चांगली असेल आणि अफगाण फिरकीपटूंना काही मदत मिळू शकेल. ते किवी फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. न्यूझीलंडकडेही उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारणे कठीण होईल.
दिवसाचा दुसरा सामना इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. इंग्लंड हा एक मजबूत संघ आहे, तर नेपाळ हा २०२६ च्या टी-२० विश्वचषकात दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय संघ आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हजारो नेपाळी चाहते जमण्याची अपेक्षा आहे. नेपाळची गोलंदाजी खूप चांगली आहे. वानखेडेची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही अनुकूल आहे. सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. या सामन्यात नेपाळला धक्का बसेल.
टी-२० विश्वचषकाच्या सुपर संडेचा तिसरा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंका घरच्या मैदानावर खेळत आहे आणि फिरकीपटूंना महत्त्वपूर्ण मदत मिळू शकते. आयर्लंडने यापूर्वी अनेक प्रमुख संघांना पराभूत केले आहे. त्यामुळे श्रीलंकेने त्यांना कमी लेखण्याची चूक करू नये. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल.
A bumper day two of the #T20WorldCup coming on up 🫡 Enter your predictions 🔮 How you can watch 📺 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/mHh2D9jNHw — ICC (@ICC) February 8, 2026






