लाकडी दांड्याने वडिलांची हत्या (फोटो सौजन्य - PINTEREST)
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहराच्या कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षित बालकाची (अल्पवयीन गुन्हेगार) डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News: बिटकॉइनमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल ९६.९३ लाखांची फसवणूक
मृत तरुणाचे नाव किरण चौरे आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ला करणाऱ्या चार तरुणांनी मिळून किरण याच्यावर दगडाने वार करत हत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
ही हत्या नाशिक शहराच्या कामटवाडे परिसरात घडली असून या प्रकारणांनंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास करत आहेत. मारेकऱ्यांचा शोध पोलीस करत आहेत. ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सतत नाशिकमध्ये होत असलेल्या हत्या आणि गुन्ह्यांनी संतापाचे वातावरण आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
‘बंटी-बबली’ला गजाआड
नाशिक शहरातील विविध बस्थानकांवर गर्दीचा फायदा प्रवाश्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी होत असलेल्या पंचवटीतील ‘बंटी-बबली’ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील महामार्ग, ठक्कर बाजार, द्वारका आणि नाशिकरोड येथील बसस्थानकांवर प्रवाशांकडून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधातील पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याचे दागिने विकून एक कार विकत घेतल्याचे उघडकीस आले आहे आहे. पोलिसांनी साडे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मंगेश अशोक राखपसरे आणि निशा मंगेश राखपसरे (दोघे रा. अवधूतवाडी, पंचवटी) आहे. संशयित आरोपी हे देवळाली कॅम्पजवळील संसरी गावात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे हवालदार प्रशांत मरकड यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक रवींद्र बागूल आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण