Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…

सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेलेल्या ठाण्यातील एका मराठी कुटुंबासोबत कोलवा येथील फोर स्टार हॉटेलात धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या गाढ झोपेत असताना कर्मचाऱ्याने मास्टर की वापरून रुममध्ये प्रवेश केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 09:21 PM
गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार (Photo Credit- X)

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार
  • रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…
  • महिला आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेलेल्या ठाण्यातील एका मराठी कुटुंबासोबत तिथल्या एका नामांकित फोर स्टार हॉटेलात अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असताना हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने ‘मास्टर की’ (Master Key) वापरून त्यांच्या खोलीत चोरट्या पावलांनी शिरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच वेळी कुटुंबातील महिला सदस्याला जाग आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी गोव्यातील स्थानिक पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, हॉटेल व्यवस्थापनाने या संवेदनशील प्रकरणात कोणतीही मदत न करता असहकार्याची भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

ठाण्यात राहणाऱ्या प्राजक्ता शेट्टीगर या त्यांच्या पती आणि मुलासोबत गोव्यात पर्यटनासाठी गेल्या होत्या. गोव्यातील दक्षिण भागात असलेल्या कोलवा परिसरातील नामांकित ‘गोल्डन क्राऊन हॉटेल’ मध्ये त्यांचा मुक्काम होता. २४ मे २०२६ च्या रात्री शेट्टीगर कुटुंब हॉटेलमधील रुम नंबर १०३ मध्ये झोपले होते. रात्री साडेदहा वाजता संपूर्ण कुटुंब झोपी गेले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजेच रात्री ११ च्या सुमारास खोलीच्या दाराजवळ काहीतरी हालचाल होत असल्याचे आणि कोणीतरी आत शिरत असल्याचे प्राजक्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत दाराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना हाऊस कीपिंग विभागातील एक कर्मचारी ‘मास्टर की’ चा वापर करून दरवाजा उघडून आत शिरताना रंगेहाथ दिसला. शेट्टीगर दाम्पत्याने त्याला रात्रीच्या वेळी विनापरवानगी रुममध्ये शिरण्यामागचे कारण विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

कर्मचाऱ्याची वेगवेगळी कारणे अन् संशयास्पद वर्तन

या प्रकारानंतर संतप्त शेट्टीगर कुटुंबाने तात्काळ हा विषय हॉटेलच्या हाऊस कीपिंग मॅनेजरच्या कानावर घातला. मॅनेजरने विचारणा केली असता, “खोलीतील एसी (AC) खराब झाल्याचा निरोप मिळाल्याने मी दुरुस्तीसाठी जात होतो,” असे उत्तर संबंधित कर्मचाऱ्याने दिले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे याच कर्मचाऱ्याने यापूर्वी शेट्टीगर कुटुंबाला वेगळेच कारण सांगितले होते. “तुम्ही रुममध्ये डबल बेड मागितला होता, तो देण्यासाठी मी आलो,” अशी बतावणी त्याने केली होती. कर्मचाऱ्याच्या या संशयास्पद आणि परस्परविरोधी उत्तरांमुळे कुटुंबाचा संशय बळावला आणि प्राजक्ता शेट्टीगर यांनी थेट पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

Cyber Crime : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

हॉटेल व्यवस्थापनाचे निर्लज्ज वर्तन

स्थानिक गोवा पोलिसांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत शेट्टीगर कुटुंबाला पूर्ण सहकार्य केले. मात्र, ज्या फोर स्टार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, त्यांच्या व्यवस्थापनाने काडीमात्र सहकार्य केले नाही. “आम्ही रिसेप्शनला कोणताही कॉल केला नव्हता. आम्ही ना एसी बंद असल्याची तक्रार केली, ना डबल बेडची मागणी केली. तरीही हाऊस कीपिंग कर्मचारी आमच्या रुममध्ये मास्टर की वापरुन चोरून शिरला. त्यावेळी जर मला जाग आली नसती, तर आमच्या सोबत काय अनर्थ घडला असता, याचा विचार करूनही अंगावर काटा येतोय.”

प्राजक्ता शेट्टीगर यांनी पुढे सांगितले की, “हॉटेल कर्मचाऱ्याची उघड चूक असताना पोलीस तक्रार दाखल करताना हॉटेलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा होती. पण हॉटेलच्या जनरल मॅनेजरला फोन केला असता, मी शहराबाहेर असल्याचे सांगून त्याने फोन बंद (Switched Off) केला. हाऊस कीपिंग मॅनेजरनेही या प्रकरणात रस दाखवला नाही आणि त्याची ड्युटी संपताच तो निघून गेला. आम्ही फक्त त्या कर्मचाऱ्याला निलंबित करतो, एवढेच मोघम उत्तर त्यांनी दिले.”

महिला आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळावर फोर स्टार हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्यामुळे या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. “रुमची डुप्लिकेट किंवा मास्टर चावी सुरक्षा रक्षकांकडे असायला हवी, ती हाऊस कीपिंग कर्मचाऱ्याच्या हातात रात्रीच्या वेळी कशी काय असते? रुममधून कोणीही बोलावले नसताना, साधं दार न ठोठावता अशा प्रकारे मध्यरात्री आत शिरणं अतिशय भयानक आहे,” असा सवाल शेट्टीगर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

Web Title: Shocking incident involving a marathi family from thane at a four star hotel in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • crime news
  • Family
  • Goa News
  • thane

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.