नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकांडात (Murder Case) जंगलातून सापडलेल्या हाडांचे (Bones) एम्समध्ये पोस्टमॉर्टम (Postmortem at AIIMS) करण्यात आले. असे म्हणतात की, दोन किंवा तीन हाडे (2-3 Bones) करवतीसारख्या धारदार शस्त्राने कापली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र (Charge Sheet Within 15 days) दाखल करण्याचा दावा पोलीस करत आहेत.
दक्षिण दिल्ली (South Delhi) पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Postmortem Report) आला आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. करवतीसारख्या धारदार शस्त्राने काही हाडे कापल्याचे प्रकरण समोर येत असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी एक मोठे हाड आहे.
[read_also content=”पतीला उद्धवस्त करण्यासाठी पत्नीने रचला कट, मैत्रिणी आणि मित्राला धरलं हाताशी अन् स्वत:च्याच मुलाचं… https://www.navarashtra.com/crime/crime-to-distroy-her-husband-wife-kidnaps-her-own-child-in-sonipat-haryana-nrvb-361927.html”]
मात्र, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करणारे मेहरौली पोलीस ठाणे या महिन्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात श्रद्धाच्या हाडांचे पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही माहिती बुधवारी पोलिसांनाही देण्यात आली. सूत्रांनी पुढे सांगितले की, २३ हाडे शवविच्छेदनासाठी एम्समध्ये पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये बहुतांश हाडे श्रद्धाची आहेत, तर काही हाडे प्राण्यांची असल्याचेही सांगितले जात आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, दोन हाडांवर खोल कटाच्या खुणा होत्या ज्यावरून असे सूचित होते की ते करवतीसारख्या धारदार उपकरणाने कापले गेले होते. यापैकी एक हाड मांडीचे असल्याचे सांगितले जाते. याशिवाय काही हाडांवर कटाच्या खुणा होत्या. हे पाहून मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी चाकूचा वापर केल्याची माहिती आहे.
या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आरोपी आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने करवतीने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते. आफताबच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्याला हार्डवेअरच्या दुकानात नेले तिथून त्याने एक सॉ ब्लेड आणि सॉ फ्रेम खरेदी केली. सूत्रांनी पुढे सांगितले की, गुन्हा केल्यानंतर त्याने गुरुग्राम येथील कार्यालयाजवळील जंगलात करवत फेकून दिली होती.
[read_also content=”राग अनावर! त्याने कुत्र्याला फिरायला आणलं होतं बाहेर, कुत्र्याने नेमकी शेजाऱ्याच्याच घरासमोर केली घाण, त्याची सटकली आणि पुढे जे झालं ते वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/person-thrown-acid-on-another-during-fight-for-dog-potty-in-delhi-uttam-nagar-crime-nrvb-361920.html”]
गेल्या आठवड्यात पोलिसांनी दावा केला होता की, आम्ही तपासासाठी पाठवलेले केस आणि हाडे श्रद्धाचे आहेत. दिल्ली-एनसीआरला लागून असलेल्या जंगलात तपासादरम्यान पोलिसांनी केस आणि हाडे जप्त केली होती. पोलिसांनी सांगितले की, केस आणि हाडे हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोस्टिक्स केंद्रात डीएनए माइटोकॉन्ड्रियल प्रोफाइलिंगसाठी पाठवण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडे अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये हाडांचा काही भाग आणि केस श्रद्धाचे वडील आणि भावाशी जुळत असल्याचे सांगण्यात आले.