चंदिगड : गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याप्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला (Sachin Bishnoi) परदेशातून अटक केली आहे. आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून (Azarbaijan) ताब्यात घेतले असून हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून (Wanted) गेल्याचे समोर आले होते.
सचिन बिश्नोई हा गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड (Mastermind) आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सचिनने सोशल मीडियावर दावा केला होता की, त्याने ही हत्या घडवून आली. तसेच लॉरेन्स बिश्नोईसोबत त्याने मुसेवालावर हल्ला घडवून आणली. सचिन बिश्नोईचा शोध गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलीस घेत होते.






