मुलांची पालकांना मारहाण (फोटो- istockphoto)
मुलाने वडील आणि बहिणीला केली मारहाण
दारूच्या नशेत तरुणाने केले कृत्य
कणकवलीमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
कणकवली: दारूच्या नशेत असलेल्या भावाने वडील, बहीणाला मारहाण केल्याची घटना मंगळवार दुपारी ३ वा. कणकवली-सिद्धार्थनगर येथे घडली. याप्रकरणी सायली जाधव (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील संतोष जाधव (वय ३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दुपारी स्वप्नील जाधव मद्य पिऊन घरी आला.
बहीण सायली हिला तू – मला शिळे जेवण खायला का देतेस ही विचारणा करीत सायली हिला मारहाण केली. त्याचे वडील तिला वाचविण्यासाठी आले असता स्वप्नील याने शिवीगाळ करीत लाकडी दांडयाने दोघांना मारहाण केली. यात संतोष जाधव, सायली जाधव यांना दुखापत झाली. सायली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिस तपास करीत आहेत.
आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार
राज्यात मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शोधमोहीमेच्या कामगिरीवरून संबंधित पोलिस ठाण्यांचे नामांकन ठरविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांच्या बेपत्ता प्रकरणांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणांमध्ये शासनाने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.
Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते. महिलांच्या शोधदरात सध्या १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमांना आता तंत्रज्ञानाची मोठी साथ मिळत आहे. केवळ मानवी तपासावर अवलंबून न राहता, पोलीस आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत डेटाबेचा वापर करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे.






