Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

नातेपुते येथे 22 वर्षीय पायल रणदिवे हिने हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. छळाच्या आरोपांवरून पती, सासू-सासरे व दीराविरुद्ध गुन्हा; काही आरोपींना अटक, तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 01:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य
  • आत्महत्येपूर्वी हातावर मजकूर लिहिल्याचा दावा
  • मारहाणीचे व्रण असल्याचा माहेरच्यांचा आरोप
सोलापूर: सोलापूर येथील फलटणमध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पायल रणदिवे (वय-२२) असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर डोळे डोळे पाणवणारा मजकूर लिहिले. या घटनेनंतर पोलिसांनी सासू- सासरे दीर आणि पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे घडली.

नेमकं काय घडलं?

पायल हिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते. यासाठी तिने क्लासही लावला होता. मात्र तिच्या सासरच्यांनी तो क्लास बंद केला. शनिवारी सायंकाळी घरात कोणीनासतांना पायल हिने आत्महत्या केली. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा असल्याने तिच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू- सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या हातावर मजकूर लिहिला होता.

Vasai Virar: नालासोपाऱ्यात गुंडाची निर्घृण हत्या; 7-8 जणांनी चाकूने केले सपासप वार

मजकुरात काय?

“हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले .. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग .. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही .. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले .. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते .. SORRY”, असे तिने हातावर लिहिले आहे.

गुन्हा दाखल?

पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत रणदिवे याच्यासह तिचे सासू- सासरे यांना अटक केली असून पायलच्या दिराचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी पायलचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार. या घटनेमुळे नातेपुते परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

सोलापुरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. सुनेने सासूला मारण्यासाठी सासूच्या कळशीत विष मिसळवले, मात्र तो पाणी सासूने न पिता तिच्या पतीने पिला आणि पतीचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली अनैतिक संबंधातून सुनेने हे भयंकर कट रचल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधाची कुणकुण तिच्या सासूला लागली होती. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र या कटात सासूची मृत्यू न होता तिच्या पतीची मृत्यू झाली. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येपूर्वी काय आढळले?

    Ans: हातावर मजकूर लिहिल्याचा दावा, ज्यात छळाचा उल्लेख.

  • Que: कोणावर गुन्हा दाखल?

    Ans: पती, सासू-सासरे आणि दीराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.

  • Que: तपासाची स्थिती काय?

    Ans: काही आरोपी अटकेत; पुढील तपास पोलिसांकडून सुरू.

Web Title: Solapur crime im laughingpain written on my hand and 22 year old married woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
1

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
2

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Solapur News: कृषीनंतर पशुसंवर्धन विभागही ‘कमकुवत’; मनुष्यबळ-अधिकार घटल्याने पशुपालक चिंतेत
3

Solapur News: कृषीनंतर पशुसंवर्धन विभागही ‘कमकुवत’; मनुष्यबळ-अधिकार घटल्याने पशुपालक चिंतेत

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
4

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.