Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या संवेदनशील खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध १ हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 10:59 AM
न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार

न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार

Follow Us
Follow Us:

पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी गुरूवारी (दि. ४) विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या झालेल्या सुनावणीदरम्यान सात वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आत शुक्रवारी (दि.5) न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या संवेदनशील खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध १ हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची विशेष न्यायालयात नियमित इन-कॅमेरा सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी एकून ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत एकून ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी तीन प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष मंगळवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. आरोपीला पीडितेसमवेत पत्र्याच्या शेडमध्ये पाहिल्याचे तिन्ही मुलांनी निर्भिडपणे न्यायालयासमोर सांगितले.

आरोपीलाही मुलांनी ओळखले

येरवडा कारागृहात झालेल्या ओळखपरेडमध्ये आणि न्यायालयात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर असलेल्या आरोपीलाही मुलांनी ओळखले. त्यामध्ये आरोपीला पीडितेसमवेत गुन्ह्याच्या घटनास्थळी पाहणाऱ्या तीन मुलांची नोंदविली गेली होती.

सहा साक्षीदारांनी यापूर्वी नोंदवली साक्ष

नसरापूर येथील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायालयात सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या साक्षीदारांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

ग्रामस्थांचीही न्यायालयात साथ

आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. यापैकी दोन साक्षीदारांनी पीडितेला आरोपीसमवेत बघितल्याचे न्यायालयासमोर सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

Web Title: Statement of forensic experts to be recorded in the nasrapur sexual assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…
1

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई
2

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
3

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल
4

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.