
जन्माला आलेली दोन्ही अपत्ये मुली आहेत म्हणून मुलगा नाही म्हणून त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून विवाहित ज्योत्स्ना पारटे यांनी स्वतःला संपवून घेतले आहे. मात्र माझ्या मुलीला सासरच्या मंडळींनी त्रास दिला आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप पिडितेचे वडिल सुहास पवार यांनी खालापूर पोलिसात तक्रार देताना केला आहे.
भूतिवली गावातील सुहास काशीनाथ पवार यांची मुलगी ज्योत्स्ना यांचा विवाह 2013 मध्ये खालापूर जवळील खरसुंडी येथील संतोष रामदास पारठे याचे सोबत विवाह झालेला होता. सन 2015 मध्ये जोस्ना आणि संतोष यांना मुलगी झाली व नंतर सन 2017 मध्ये दुसरी मुलगी झाली. जोत्स्ना हिला दोन मुली झाल्या म्हणून सासरची मंडळी त्रास देत होती. जोस्ना हिचा पती संतोष रामदास पारठे हा तिचा सतत मानसिक छळ करत होता. संतोषच्या त्रासाला कंटाळून जोस्ना ही मौजे खरसुंडी येथे एकटीच राहत होती. सासरच्या जाचाला कंटाळून तिने 1 एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. पोलिसात या विवाहितेच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.खोपोली येथील मोहिते हॉस्पिटलमध्ये आल्यावर जोत्स्ना ही मयत झालेली आहे. त्यावेळी हॉस्पीटल मध्ये जावुन आम्ही पाहणी केली असता तिचे अंगावर आम्ही जखमीचे खुणा बघितल्या आढळून आलेल्या नाहीत.
त्यामुळे संबंधित प्रकार हा संशयास्पद वाटत असल्याने सुहास पवार यांनी आपल्या मुलीला सासरच्या मंडळीने मारले असल्याचं संशय व्यक्त केला आहे.दुसरीकडे ज्या ठिकाणी आत्महत्या केली तेथे असलेले छतावरील पंख्याची केवळ एक पात ही अर्धवट अवस्थेत वाकली आहे.तर ज्योत्स्ना यांचे वजन लक्षात घेता तो पंखा खाली कोसळायला हवा होता असे म्हणणे मांडले आहे.त्याचवेळी गळफास घेतल्याची कोणतीही निशाण अथवा खूण आढळून येत नसल्याने शंका घेतली जात आहे.त्यामुळे ज्योत्स्ना पारटे यांचा मृत्यू हा घातपात की हत्या याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.या प्रकाराने खळबळ माजली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याने राजकीय दबाव आहे काय? असा शाह संशय व्यक्त होत आहे. आजच्या काळात जग आधुनिकीकरणाकडे जात आहे मात्र तरी देखील अशा पद्धतीच्या घटानांनी एखाद्या विवाहित स्त्रीला जीव गमवावा लागतो ही दु:खद बाब आहे.