काय घडलं नेमकं?
घडलेली घटना अंबरनाथ पश्चिमेतील लादी नका परिसरात घडली. सकीना कुरेशी असे मृत चिमुकल्याच्या आईचे नाव आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव विकास सिंह असे आहे. सकीना आणि विकास हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगा हुसनैन राहत होता. हुसनैन घरात असल्याने दोघांच्या शारीरिक संबंधात सतत अडथळा निर्माण होत होता. यावरून आरोपी विकास सिंह प्रचंड चिडला होता. याच रागातून विकासने हुसनैनवर जीवघेणा हल्ला केला. त्याने चिमुकल्याच्या डोक्यावर वरवंट्याने जोरदार प्रहार केले तसेच त्याच्या गुप्तंगावर आणि शरीरावर अमानुष मारहाण केली.
यात हुसनैन हा गंभीर जखमी झाला आहे. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास चिमुकल्या हुसनैनची प्राणज्योत मालवली. यांनतर आरोपी विकास सिंह आणि चिमुकल्याचा आई सकीना कुरेशी या दोघांनी हे निर्घृण कृत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास सिंह याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिमुकल्याची आई सकीना हिने हे कृत्य लपवण्यात हिची काही मदत किंवा सहभाग होता का, या अँगलने देखील पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. या घटनेने अंबरनाथ हादरला आहे.
Ans: आईचा लिव्ह-इन पार्टनर विकास सिंह.
Ans: होय, आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ans: बालकाच्या आईचा गुन्हा लपवण्यात किंवा हल्ल्यात काही सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.






