Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

पतीने पत्नीच्या गळ्यावर तसेच पोटावर केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. मात्र, महिलेच्या शरीरावर बाहेरून गंभीर मारहाणीच्या स्पष्ट खुणा न दिसल्याने मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2026 | 07:57 AM
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नी यामिनी यादव (वय ३८, रा. झिंगाबाई टाकळी) हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना झिंगाबाई टाकळी परिसरात घडली. पतीने पत्नीच्या गळ्यावर तसेच पोटावर केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. मात्र, महिलेच्या शरीरावर बाहेरून गंभीर मारहाणीच्या स्पष्ट खुणा न दिसल्याने मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

शवविच्छेदनाच्या अहवालात मणक्याचे हाड तुटल्याचे तसेच पोटात रक्तस्राव झाल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पती कृष्णलाल यादव (वय ४१) याला अटक केली. झिंगाबाई टाकळी परिसरातील भाड्याच्या खोलीत दाम्पत्य राहत होते. त्यांना १० वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी आहे. कृष्णलाल हा बँकेत खासगी नोकरी करत असल्याची माहिती आहे. यामिनीच्या मृत्यूची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Social Media Donation Fraud : ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

प्राथमिक पाहणीत यामिनीच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्या नाहीत. चेहऱ्यावर काही व्रण होते. मात्र, कोणत्याही शस्त्राचा वापर झाल्याचेही दिसले नाही. त्यामुळे सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कृष्णलालला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

शवविच्छेदन अहवालाने तपासाला कलाटणी

मानकापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी तपासाला गती दिली. गुरुवारी सायंकाळी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये यामिनीच्या मणक्याचे हाड तुटल्याचे तसेच पोटात रक्तस्राव झाल्याचे नमूद केले. गंभीर दुखापती मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीत हत्येचे कलम वाढवले. त्यानंतर कृष्णलाल यादव याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली.

बुधवारी रात्री झाला होता वाद

बुधवारी रात्री यादव दाम्पत्यामध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वाद विकोपाला गेला. संतापलेल्या कृष्णलालने यामिनीला हातबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या गळ्यावर तसेच पोटावर मारहाण केली. मारहाणीत यामिनी कोसळली. काही वेळाने तिची प्रकृती गंभीर झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णलालने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी यामिनीला मृत घोषित केले.

Web Title: Wife murdered following a family dispute incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
1

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
2

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
3

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
4

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.