Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

पत्नी माहेरून परत येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दारुडी पतीने सासरच्या घरात पेट्रोल ओतून आग लावली. घराचे मोठे नुकसान झाले; मात्र कुटुंबीयांनी मागील दाराने पळ काढल्याने जीवितहानी टळली. आरोपी पसार असून पोलीस शोध घेत आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 12:52 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नी पतीच्या छळाला कंटाळून मुलांसह माहेरी राहत होती
  • नकार मिळताच पतीने सासरच्या घराला पेट्रोल ओतून आग लावली
  • कुटुंबीय थोडक्यात बचावले; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तेलंगणा: तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरून परत येण्यास नकार दिला म्हणून पतीने रागाच्या भरात थेट आपल्या सासरच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. सासरच्या मंडळींनी मागील दाराने पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी माथेफिरू पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निजामपेट येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

काय घडल नेमकं?

पिटलम बलैया यांची मुलगी सायव्वा हिचा विवाह १५ वर्षांपूर्वी रवी नावाच्या तरुणाशी झाला होता. तीन मुले देखील या दाम्पत्याला आहे. मात्र रवीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन पत्नीला अमानुष मारहाण आणि छळ करत होता. म्हणून या सततच्या त्रासाला कंटाळून सायव्वा गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलांसह माहेरी राहत होती.

पंचायतीची भरवण्यात आल्या मात्र…

या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आनंद गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पंचायतीही भरवण्यात आल्या. मात्र रवीचा दारूचा व्यसन करणं आणि छळ करण यात काही बदल झाला नाही. त्यामुळे सायव्वा पुन्हा पतीच्या घरी जाण्यास तयार नव्हती. याचाच राग रवीच्या मनात होता.

पेट्रोल ओतून लावली आग

गुरुवारी रात्री रवी आपल्या सासरच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पत्नीला आपल्यासोबत पाठवण्यासाठी सासरच्या मंडळींशी जोरदार वाद घातला. परंतु त्याच्या वागणुकीत बदल न आल्याने सासरच्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. हा नकार ऐकताच रवीचा पारा चढला. त्याने आपल्यासोबत बाटलीत आणलेले पेट्रोल संपूर्ण घरात शिंपडले आणि आग लावून दिली.

सुदैवाने जीवितहानी नाही

या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. घराच्या आवारात उभी असलेली सायकल आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत मागच्या दाराने बाहेर धाव घेतली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी रवी घटनास्थळावरून पसार झाला.

गुन्हा दाखल

सासरच्या मंडळींनी आगीला शांत करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करण्याचा आश्वासन दिले आहे.

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: पतीने सासरच्या घराला आग का लावली?

    Ans: पत्नी माहेरून परत येण्यास तयार नसल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केले.

  • Que: या घटनेत कोणी जखमी झाले का?

    Ans: नाही. सासरच्या मंडळींनी प्रसंगावधान राखून मागील दाराने पळ काढला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Telangana crime when his wife refused to return from her parents house the enraged husband set his in laws house on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके
1

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला
2

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…
3

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त
4

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.