Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: टेंभू उपसा सिंचन विभागात लाच घेताना कार्यकारी अभियंता आणि महिला कनिष्ठ अभियंता अटक

लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिक विद्युत पथक योजनेला सेक्युरिटी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम तक्रारदार करतात.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 29, 2025 | 05:36 PM
Tembhu Irrigation Bribe Trap

Tembhu Irrigation Bribe Trap

Follow Us
Follow Us:
  •  ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्‍या कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ  अटक
  • १९ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष माधुरी देवरे यांनी १७ हजारांच्या लाचेची मागणी
  • माधुरी देवरे या १७ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ
Satara News: सुमारे साडेचार लाख रुपये बिलांपैकी ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्‍या कार्यकारी अभियंत्यासह महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. टेंभू उपसा सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता आनंद रामदास काळमेघ (वय ५१, रा. सिल्वर ओक बिल्डिंग, सैदापूर-कराड, मूळ रा. मार्केट यार्ड, पुणे) व कनिष्ठ अभियंता माधुरी साई देवरे (वय ३५, रा. सिल्वर गार्डन अपार्टमेंट, बनवडी फाटा, कराड) अशी लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्यांची नावे आहेत.  ( Crime News) 

Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?

लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील टेंभू उपसा सिंचन यांत्रिक विद्युत पथक योजनेला सेक्युरिटी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम तक्रारदार करतात. त्याअंतर्गत त्यांनी प्रतिदिन ६१० रुपयेप्रमाणे तीन सुरक्षारक्षक पुरवले होते. या सुरक्षारक्षकांचे एकूण ५ लाख ९४ हजार ७२० रुपये बिल कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयाला टेंभू कार्यालयाकडून पाठविण्यात आले.   १२ नोव्हेंबर रोजी या बिलापैकी ४ लाख ६६ हजार ९६० रुपये तक्रारदाराच्या खात्यावर जमा झाले. मात्र, हे बिल मंजुरीला पाठवल्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्केप्रमाणे कनिष्ठ अभियंता माधुरी देवरे यांनी लाच मागितली होती. (Bribe News) 

Hyderabad Crime: घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल,नेमकं कारण काय?

कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल

१९ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष माधुरी देवरे यांनी १७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच कार्यकारी अभियंत्यांनाही भेटण्यास सांगीतले. त्याप्रमाणे दि. २६ नोव्हेंबर रोजी पडताळणी कारवाईवेळी कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार दि. २८ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आनंद काळमेघ हे २५ हजार रुपये तर माधुरी देवरे या १७ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ आढळल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title: Tembhu irrigation bribe trap executive engineer junior engineer held red handed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Bribe News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
1

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी
2

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
3

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
4

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.