Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Murder Case : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातून हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने कड्यावरून कथितरित्या ढकलून अल्पवयीन प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत संशयित आरोपीला अटक केली असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 02:14 PM
Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Follow Us
Follow Us:
  • कांदिवली पूर्व येथील डोंगराळ भागात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
  • तांत्रिक पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी २४ तासांत संशयिताला अटक केली.
  • हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
पुण्यातील केतन हत्याकांडाचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबईतून आणखी एक घटना समोर येत आहे. दोन्ही घटनेत बरेच साम्य आढळले असून फरक इतकाच की यावेळी मुलाची नाही तर मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात घडल्याची माहिती असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच आरोपीचा अटक केली आहे. मृत मुलगी अल्पवयीन असून प्रियकराकडूनच ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

टेकडीवरुन प्रेयसीला दिला धक्का

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी दामुनगरच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर समतानगर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी चाैकशीला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाला सील करुन फॉरेंसिक टीमच्या मदतीने वैज्ञानिक पुरावे गोळा केले. यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांची चौकशी केली. हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या आणि मृताची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचा वापर केला. तपासात उघड झाले की, मृत मुलीचे सुरज मारुती नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

डिलिव्हरी बाॅयला केली अटक

तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या शोधकार्याला सुरुवात केली. तपासात आरोपीची कथित भूमिका समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली. आरोपी व्यावसायाने एक डिलिव्हरी बाॅय आहे. पोलिस सध्या त्याची चाैकशी करत असून हत्येचा संपूर्ण कट आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही हत्या पूर्वनियोजित होती की रागाच्या भरात घडली याचाही तपास पोलिस करत आहेत.

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

 तपासानंतर होणार कायदेशीर कारावाई 

पोलिस सध्या आरोपीची कसून चाैकशी करत असून हत्येमागचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे डीसीपी गजानन राजमाने यांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरा हेतू समजेल आणि यानंतरच आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई  केली जाईल.

Web Title: Mumbai kandivali minor girl allegedly pushed off hill by boyfriend delivery boy arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime news
  • Ketan Agrawal Murder Case
  • Mumbai Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
1

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
2

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
3

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
4

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.