Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत दोन गांजा तस्करांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 02:47 PM
चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त

चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त

Follow Us
Follow Us:

चाकण : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत दोन गांजा तस्करांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करीत आहेत.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विशेष पथके तयार केली होती. ही पथके पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्षे व विजय दौंडकर यांना संशयित हालचाली आढळून आल्या. त्यानंतर १८ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुबी बेकरीजवळ, खंडोबा माळ येथे छापा टाकण्यात आला.

या कारवाईत अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. शिवसाईनगर, कोथरूड, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, ७५ हजार रुपयांचे तीन मोबाईल, ५१० रुपये रोख रक्कम आणि १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

संपर्क साधण्याचे आवाहन

दरम्यान, अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२० या क्रमांकावर, पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा ‘मानस’ हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस शिपाई सुभाष गुरव व प्रकाश ननावरे यांनी विशेष सहकार्य केले.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

Web Title: The anti narcotics squad has carried out a major operation in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chakan News
  • Drugs Case

संबंधित बातम्या

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…
1

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
2

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई
3

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
4

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.