Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर पोलिसांची कामगिरी “सुमारच”; पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस ‘सरस’..!

पुण्याच्या दृष्टीने नुकतेच स्वतंत्र आयुक्तालय स्थापन होऊन काम करणारे पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस पुण्यापेक्षा ‘सरस’ कामगिरी करत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2024 | 12:28 PM
सायबर पोलिसांची कामगिरी “सुमारच”; पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस ‘सरस’..!
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/ अक्षय फाटक : सायबर गुन्ह्यांचा आकडा मोठा असला तरी स्मार्ट सिटी, आयटी हब व शिक्षणाच्या माहेर घरातील पुणे पोलिसांची कामगिरी ‘सुमार’ आहे. उलटपक्षी पुण्याच्या दृष्टीने नुकतेच स्वतंत्र आयुक्तालय स्थापन होऊन काम करणारे पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस पुण्यापेक्षा ‘सरस’ कामगिरी करत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. यंदाच्या आकडेवीराचा लेखाजोखा पाहिला असता तुलनात्मकरित्या हे स्पष्ट दिसून आले आहे.

सायबर गुन्ह्यात जिल्ह्यातील ६५ हजारहून अधिक नागरिकांना जाळ्यात ओढून ११०० कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. चालू वर्षात शेअर मार्केट, गुंतवणूक, पॉलिसी फ्रॉड, ऑनलाईन कामकाज, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड, फिशींग कॉल, लिंकद्वारे फ्रॉड, फेक नावाने कॉल तसेच डेबीड, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड व ओटीपी शेअरद्वारे झालेले फ्रॉड, सेक्सस्टॉर्शन आणि इतर सायबर फ्रॉड यामध्ये सर्वाधिक फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी लोन अॅप, सेक्सस्टॉर्शनमध्ये सर्वाधिक फसवणूक झाली होती. दरवर्षी मोडस बदलून सायबर चोरटे नागरिकांना गंडा घालतात. गेल्या काही महिन्यांपासून डिजीटल अॅरेस्ट व पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळले आहे किंवा तुमच्या कागदपत्र व मोबाईल क्रमांकाचा वापर हा गैरव्यवहारासाठी झाला आहे, असे सांगत पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूक करत आहेत.

वर्षाला सायबर गुन्ह्यांचा आकडा वाढत असला तरी ते गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र अत्याल्पच आहे. कमी मनुष्यबळ, आधुनिक सामग्री तसेच सोयीसुविधा कमी असताना पोलीस काम करतात. परंतु, तरीही पुणे व पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या तुलाना केली, तेव्हा पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडे पोलीस सरस ठरत असल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दीड ते दोन महिन्यांपुर्वी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू झाले आहे. त्यात ९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ७ गुन्हे उघडकीस आणत ८२ आरोपींना पकडले आहे. तर पुणे सायबर पोलिसांकडे जवळपास २०० गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील १८ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. या १८ गुन्ह्यात २६ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यातील गुन्हेगार “अज्ञात” आहेत असेच म्हणावे लागेल.

हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्यांकडून आमिष दाखवत फसवणूक; तब्बल 1 कोटी 89 लाखांना घातला गंडा

पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे

सायबर पोलीस ठाणे- ९ गुन्हे दाखल

एकूण गुन्हे दाखल- २८४ नोंद

सायबर पोलिसांकडून ३० गुन्हे उघड, ८२ आरोपी अटक

महिन्याला सरासरी दोन ते अडीच हजार तक्रारी

एकूण फसवणूक रक्कम- ४३० करोड

पुणे पोलीस सायबर गुन्हे

सायबर पोलिसांकडे एकूण दाखल गुन्हे—१३७०

सायबर पोलिसांकडे तपासावरील गुन्हे- १९४

इतर स्थानिक पोलिसांकडे दाखल गुन्हे- ११७६

सायबर पोलिसांकडून उघड गुन्हे- १८ व २६ आरोपी अटक

एकूण फसवणूक रक्कम- ६७० करोड

Web Title: The cyber police has taken action by uncovering many crimes in pune district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • cyber crime
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
1

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.