Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : फसवणूक करणाऱ्या दोघांना ठोेकल्या बेड्या, सायबर पोलिसांची कारवाई

सायबर गुन्हेगारांनी पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2025 | 12:30 AM
फसवणूक करणाऱ्या दोघांना ठोेकल्या बेड्या, सायबर पोलिसांची कारवाई

फसवणूक करणाऱ्या दोघांना ठोेकल्या बेड्या, सायबर पोलिसांची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : सायबर गुन्हेगारांनी पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होतो, असे सांगून त्यांची १.१२ कोटींची फसवणूक केली होती. याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणातील म्यूल अकाउंट हॅन्डलर आणि त्याच्या साथीदाराला मीरा-भाईंदर मधून अटक केली. मितेश राजूभाई व्होरा (३४, अहमदाबाद), केपिन अजितकुमार मेहता (४१, अहमदाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मितेश हा गुजरात मधून म्यूल अकाउंट घेऊन केपिन याला पाठवत होता. केपिन हा फसवणुकीची रक्कम अशा म्यूल अकाउंटवर घेत होता.

जानेवारी २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व्यक्तीला सायबर आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडून एक कोटी ३० लाख २३ हजार ५१५ रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास बसण्यासाठी त्यांना काही रक्कम परत केली. मात्र एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणात आरोपी अहमदाबाद गुजरात येथे असल्याचे समजले. त्यानुसार सायबर पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली. म्यूल अकाउंट मधील पैसे रोख स्वरूपात बँकेतून काढणारा मितेश व्होरा याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदार मीरा भाईंदर येथे आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी केपिन मेहता याला मीरा-भाईंदर मधून अटक केली. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात भीषण अपघात; कात्रजवळ दुचाकी खांबावर आदळून दोघांचा मृत्यू

ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, सुरज शिंदे, जयश्री माळी, सरिता तुपे, शुभांगी ढोबळ, धरती वाडेकर, ईश्वरी आंबरे, वैशाली बर्गे, धनश्री प्रधान, मोनिका बिच्चेवार, दीपाली चव्हाण यांनी केली.

हे सुद्धा वाचा : ‘ती’, सुरक्षित नाही! सव्वा महिन्यात सव्वाशे विनयभंग अन् अत्याचाराच्या तब्बल…

Web Title: The cyber police have arrested two fraudsters and taken action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • cyber crime
  • Froud
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा
4

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.