Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; दोन गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याला विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 12:30 AM
अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Follow Us
Follow Us:

माळेगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याला विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शंकर मोरे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(३५), ५(२५) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दुपारी सुमारे ४.१० वाजता सांगवी येथील कार्तिक हॉटेलसमोर संशयित हालचाली करत असताना अक्षय तावरे याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना दोन गावठी पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या. त्यानंतर संपूर्ण शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मनमानी; शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कल्याण तावरे याच्याविरुद्ध यापूर्वी वडगाव निंबाळकर, फलटण ग्रामीण, जेजुरी, दौंड, इंदापूर, खंडाळा (सातारा) आणि राजगड पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर करीत असून, कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

दौंड पोलिसांची ध्वनीप्रदूषणाविरोधात कारवाई

दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही बुलेट व इतर मोटारसायकल चालकांकडून वाहनांचे मूळ सायलेंसर बदलून मोठा व कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर दौंड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १९ बुलेट व मोटारसायकली ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती संबंधित वाहनांवर बसविण्यात आलेले मॉडिफाईड सायलेंसर काढून टाकण्यात आले. तसेच वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: The malegaon police have arrested a young man for illegally possessing a weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
1

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
2

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
3

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…
4

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.