Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 02:45 PM
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही नामंजूर करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेल्या तपासणीत काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे तसेच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. यानंतर प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीअंती पाच परवानाधारकांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

 

याशिवाय, शस्त्र परवाना मंजूर झाल्यानंतरही विहित मुदतीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या दोन परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच वृद्धत्व किंवा मृत्यू झालेल्या आठ परवानाधारकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांचीही छाननी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत अर्जदारांकडे शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक व सबळ कारणे नसल्याचे निष्पन्न झाल्याने ६८ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; 14 जणांवर गुन्हा दाखल

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भविष्यातही शस्त्र परवान्यांबाबत असेच कठोर धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे शस्त्र परवान्यांच्या गैरवापरावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मयूर काळूराम भोईर (वय 30 वर्षे, हिंजवडी, पुणे), सुभाष भिकाजी सपकाळ (वय 70 वर्षे, नवी सांगवी, पुणे), विजय नामदेव लांडे (वय 48 वर्षे, भोसरी, पुणे), साहिल राजेंद्र ढमाले (वय 32 वर्षे, देहूगाव, पुणे) आणि शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय 71 वर्षे, आंबेगाव, पुणे) या व्यक्तींविरुद्ध शस्त्रांचा गैरवापर व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने चौकशीअंती त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

  • १५ शस्त्र परवाने रद्द
  • ६८ नवीन अर्ज नामंजूर
  • ५ जणांचे परवाने गैरवापर व गुन्हे नोंदीमुळे रद्द
  • २ जणांचे परवाने शस्त्र खरेदी न केल्याने रद्द
  • ८ जणांचे परवाने वृद्धत्व किंवा मृत्यूमुळे रद्द
हे सुद्धा वाचा : माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी…; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

Web Title: The pimpri chinchwad police have revoked the weapon licenses of many individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
2

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
3

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
4

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.