Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा, दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल लाखोंचे दागिने जप्त

मागील काही दिवसात यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी घरफोड्यांचे सत्र सुरू होते. दरम्यान या चोरट्यांचा शोध घेत पोलिसांनी दोन सराईतांना अटक करून तब्बल १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 05:15 PM
16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा, दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल लाखोंचे दागिने जप्त

16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा, दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल लाखोंचे दागिने जप्त

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : मागील काही दिवसात यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी घरफोड्यांचे सत्र सुरू होते. या चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले होते. दरम्यान या चोरट्यांचा शोध घेत पोलिसांनी दोन सराईतांना अटक करून तब्बल १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून १५ लाख ६८ हजाराचा सोन्या-चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली आहे.

 

सागर ऊर्फ राजरतन पवार (वय ३५, रा. शिवाजीनगर, चांदूर रेल्वे, जि. अमरावती), विजयसिंग मानसिंग पवार (वय २५, रा. तरोडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी चोरट्यांची नावे आहेत. शहरातील विविध भागांत घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे निर्देश दिले होते. दरम्यान एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना बाभूळगाव ते करळगाव घाटामध्ये दोघे जण विनाक्रमांकाच्या दुचाकीवर तोंडाला मास्क बांधून यवतमाळकडे जाताना दिसले. या दोघांवरही संशय येताच पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता १०८.६१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २३४ ग्रॅम चांदीचे दागिने, ८९ हजार ३०० रुपये रोख, तसेच पेचकस, लोखंडी हूक, टॉर्च आदी घरफोडीचे साहित्य आढळून आले. यात १५.६८ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. या कारवाईमुळे यवतमाळ, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी परिसरातील एकूण १६ गुन्ह्यांची उकल झाली. पोलिस तपासात आरोपींनी यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सागर इंगळे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, रूपेश पाली, नीलेश राठोड, रितुराज मेढवे, सुनील पैठणे, प्रतीक नेवरे, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी यांनी केली.

१५ घरफोड्यासह एक जबरी चोरी उघडकीस

यवतमाळ जिल्ह्यातील १५ घरफोड्या आणि एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. यात यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे ३, अवधूतवाडीचे ६, लोहारा २, बाभूळगाव २ तसेच दारव्हा, आर्णी आणि दिग्रस पोलिस स्टेशनअंतर्गत प्रत्येकी १ असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आले.

Web Title: The police have arrested two burglars who used to break into houses and commit theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

सासवड पोलिसांची मोठी कारवाई, गाई अन् म्हशी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; तब्बल…
1

सासवड पोलिसांची मोठी कारवाई, गाई अन् म्हशी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; तब्बल…

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
2

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

खबरदार! कोर्टरूममध्ये रील्स काढणे पडेल महागात; बार कौन्सिलची नवी आचारसंहिता जारी
4

खबरदार! कोर्टरूममध्ये रील्स काढणे पडेल महागात; बार कौन्सिलची नवी आचारसंहिता जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.