Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेन-ट्रॅव्हल्सने यायचे अन् मोबाईल लांबवायचे; झारखंड- बिहारच्या दोघांना दीड तासात ठोकल्या बेड्या

ट्रेन-ट्रॅव्हल्सने येऊन मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईल फॉरमॅट करून कमी किंमतीत ते विकात होते. याप्रकरणी चोरट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 12:00 PM
ट्रेन-ट्रॅव्हल्सने यायचे अन् मोबाईल लांबवायचे; झारखंड- बिहारच्या दोघांना दीड तासात ठोकल्या बेड्या

ट्रेन-ट्रॅव्हल्सने यायचे अन् मोबाईल लांबवायचे; झारखंड- बिहारच्या दोघांना दीड तासात ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : ट्रेन-ट्रॅव्हल्सने शहरात यायचे, गर्दीची ठिकाणे हेरायची, नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाइलवर डल्ला मारायचा व चोरीचा मोबाईल फॉरमॅट करून कमी किंमतीत विकायचा, याप्रकरणी चोरट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बिहारच्या त्या दोघां चोरट्यांना जवाहरनगर ठाण्याच्या पोलिसांनी दीड तासांत जेरबंद केले आहे. शेख फैय्याज शेख असलम (वय २१, रा. महाराजपूर, मोतीझरणा, ता. तेलझरी, जि. साहेबगंज, झारखंड) आणि नकसूद आलम इदवाह आलम (वय २०, रा. महुचौक, ता. जि. कठियाल, बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

राजेश रामराव सानप (वय ४६, रा. गल्ली क्रं. १२, जयभवानीनगर) हे २१ ऑगस्ट रोजी सकाळी सिग्मा हॉस्पिटलजवळील दर्गा रोडवर भाजीपाला घेत होते. यावेळी दोघांनी त्यांना धक्का देऊन लक्ष विचलित केले आणि त्यांच्या खिशातील २४ हजार ९९९ रुपये किंमतीचा विवो मोबाईल लांबविला. सानप यांच्या फिर्यादीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी दर्गा चौकात दोन संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढला; मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

दारू पिताना दोघांची ओळख

त्यांच्याकडून तीन चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार जमादार नवतुरे, अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी केली. अटक आरोपी शेख फैय्याज आणि नकसूद आलम हे दोघे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. चोरीच्या उद्देशाने ते वेगवेगळ्या शहरात फिरत असतांना दारू पिताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सोबत चोरी करण्यास सुरुवात केली.

चोरीचे मिळायचे महिन्याला १५ हजार 

नकसूद हा त्याच्या गावी एका व्यक्तीकडे महिन्याला १५ हजार रुपये पगारावर चोरी करत होता. चोरी केलेले मोबाईल तो पगार देणाऱ्या व्यक्तीला आणून देत होता. मात्र, पगारापेक्षा स्वतः चोरी केल्यास अधिक पैसे मिळतील, या उद्देशाने त्याने स्वतंत्रपणे चोरी सुरू केली. याचदरम्यान फैय्याजशी त्याची ओळख झाली.

हे सुद्धा वाचा : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…

मोबाईल फॉरमॅट करून करत होते स्वस्तात विक्री

ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सने शहरात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करायचे. चोरीनंतर मोबाईल तात्काळ फॉरमॅट करून तो त्याच शहरात किंवा अन्य शहरात विकायचे. हॉस्पीटलची किंवा अन्य गरज असल्याचे दाखवून ते मोबाईल कमी किमतीत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. जवाहरनगर हद्दीतील मोबाइल चोरी, दुचाकी चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: The police have arrested two thieves from jharkhand and bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…
1

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…

आईच्या निधनानंतर बापच बनला हैवान; दीड वर्षापासून लेकीवर लैंगिक अत्याचार, अखेर पाप उघडकीस’
2

आईच्या निधनानंतर बापच बनला हैवान; दीड वर्षापासून लेकीवर लैंगिक अत्याचार, अखेर पाप उघडकीस’

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
3

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
4

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.