Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

पुण्यातील दिघी परिसरात अत्याधुनिक मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ निर्मितीची गुप्त प्रयोगशाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (सीबीएन)च्या 'ऑपरेशन वज्र' मोहिमेत उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 05:32 PM
दिघीतील 'एमडी'च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

दिघीतील 'एमडी'च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील दिघी परिसरात अत्याधुनिक मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ निर्मितीची गुप्त प्रयोगशाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (सीबीएन)च्या ‘ऑपरेशन वज्र’ मोहिमेत उघडकीस आला आहे. छापा टाकून प्रयोगशाळेतील साहित्य, अत्याधुनिक उपकरणांसह १० लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती.

 

मध्य प्रदेशातील नीमच येथील सीबीएनच्या प्रतिबंधक शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक ते १० जुलैदरम्यान ‘ऑपरेशन वज्र’ राबविण्यात आले. तपासादरम्यान मुख्य आरोपी विविध राज्यांमध्ये बनावट ओळखपत्रांच्या आधारे वास्तव्य बदलत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पुण्यातील दिघी परिसरात नातेवाईकाच्या घरात एमडी तयार करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार ९ जुलैच्या मध्यरात्री पुणे आणि राजस्थानातील जोधपूर येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत जोधपूरस्थित सहआरोपीला अटक करण्यात आली. तपासात या सहआरोपीकडून दिघीतील प्रयोगशाळेला आर्थिक व तांत्रिक मदत पुरविली जात असल्याचे स्पष्ट झाले.

छाप्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्री, प्रयोगशाळेतील उपकरणे, मोठ्या प्रमाणावर काचेची भांडी, एमडी निर्मितीसाठी वापरली जाणारी प्रिकर्सर रसायने, सुरक्षा साहित्य तसेच १० लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून या अमली पदार्थ तस्करीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

दरम्यान, याच तपासातून यापूर्वी मध्य प्रदेशातील मंदसौर व महू परिसरातील बेकायदा एमडी निर्मिती प्रयोगशाळांचाही पर्दाफाश झाला होता. या वर्षात सीबीएनने १४२ गुन्हे नोंदवून १९३ आरोपींना अटक केली असून चार बेकायदा अमली पदार्थ निर्मिती प्रयोगशाळा उद्ध्वस्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

राज्य अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत, अन्न व औषध प्रशासनाने पैठण आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन खाद्यतेल युनिट्सवर मोठी धाड टाकली. या धाडीदरम्यान, ₹२,९३,३५,६०३ किमतीचे संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात तेलाची संशयास्पद गुणवत्ता, अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक आणि वापरलेल्या डब्यांमध्ये पुनर्पॅकेजिंग यांसारख्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर, दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

Web Title: The police have busted a high tech md laboratory in dighi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
1

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
2

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
3

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक
4

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.