Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या 'पुराणिक सोसायटी' मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 05:51 PM
लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या 'हाय-प्रोफाइल' पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या 'हाय-प्रोफाइल' पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पिंपरी : लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या ‘पुराणिक सोसायटी’ मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १:३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या एका बंगल्यातून मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : जेजुरी गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयुर आबनावे, भुषण कुंवर, राहुल चोरघे, प्रिती गवारी, प्राजक्ता सुतार, सतिश घोंगडे, तुषार शिंदे, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली आहे.

आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती. – सचिन पाटील, पोलीस निरीक्षक, लोणावळा.

हे सुद्धा वाचा : व्यावसायिकांचे धाबे दणाणले! सिंधुदुर्गमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरुच; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Web Title: The police have carried out a major operation by raiding a party underway at a bungalow in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Lonavala news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
4

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.