Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड

भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीररीत्या ओलांडून छत्रपती संभाजीनगरात वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2026 | 03:20 PM
ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; 'असा' झाला दोघांचा भांडाफोड

ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; 'असा' झाला दोघांचा भांडाफोड

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीररीत्या ओलांडून छत्रपती संभाजीनगरात वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मांडकी शिवारातील इमानदार ढाब्यावर कुक व वेटर म्हणून काम करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद बिलाल मोहम्मद मुकलिस्उद्दीन रेहमान (वय २७) आणि मोहम्मद रासेल मोहम्मद इरशाद अली (१९, दोघे रा. झिनायदा, बांगलादेश, ह.मु. मांडकी शिवार, पळशी) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत दोघांनी सुरुवातीला भारतीय नागरिक असल्याचे सांगितले. मात्र, मोबाईलमधील माहिती तसेच बांगलादेश सरकारचे राष्ट्रीय ओळखपत्र व जन्मप्रमाणपत्र तपासल्यानंतर त्यांचे नागरिकत्व उघड झाले.

दलालामार्फत भारतात प्रवेश

बिलाल याने २०१७-१८ च्या सुमारास दलालामार्फत सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. कोलकाता, मुंबई व छत्रपती संभाजीनगरात काम केल्याचे, तसेच कोविड काळात बांगलादेशात परतल्यानंतर पुन्हा भारतात आल्याचे त्याने सांगितले. रासेल यानेही सुमारे पाच वर्षांपूर्वी भारतात अनधिकृत प्रवेश करून कोलकाता, मनमाड व छत्रपती संभाजीनगर परिसरात काम केल्याचे सांगितले.

परत पाठविण्याची प्रक्रिया राबवणार

दोघांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, रोजगार व स्थानिक संपर्काचा तपास सुरू आहे. नागरिकत्वाची अधिकृत पडताळणी करून सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : 8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई

भारतात प्रवेशासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक लहु घोडे, अंमलदार विठ्ठल डोके, सुनील गोरे, संतोष डोंगरे, सनी खरात, संदीप कोळगे, निलेश कुडे तसेच चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, अंमलदार दिपक देशमुख, किशोर काळवणे, गणेश कोरडे, सतीष देवकर आदींच्या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर

Web Title: The police have detained two bangladeshi nationals working at a dhaba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.