Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

लातूर येथील एम जे हॉस्पिटल चे तरुण व ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४२) यांनी भुलीची इंजेक्शन्स घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी लातूरमध्ये घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 01:23 PM
लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर येथील एम जे हॉस्पिटल चे तरुण व ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४२) यांनी भुलीची इंजेक्शन्स घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी लातूरमध्ये घडली आहे. डॉ. मेहुल यांचा मृतदेह कार मध्ये आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह येथील बनसोडे हॉस्पिटलमध्ये तातडीने आणण्यात आला. परंतु तत्पूर्वीच ते मृत झाले होते, असे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले.

 

डॉ. राठोड यांचा मृतदेह पोस्टमार्टेम साठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आला आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकेल. ही आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. हाती आलेल्या माहितीप्रमाणे डॉ. राठोड सकाळी 11 वाजताच कार घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडले होते. येथील अंबाजोगाई रोडवरील हॉटेल अगस्तीच्या जवळपास त्यांची कार उभी होती. बराच वेळ कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याने सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान लोकांनी डोकावून पाहिले असता आतमध्ये डॉ. राठोड निश्चेष्ट पडल्याचे आढळले. त्यांनी हाय पॉवर अॅनेस्थेशियाचे तब्बल ३ डोसेस घेतल्याची चर्चा आहे. तथापि त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

हे सुद्धा वाचा : Mumbai Local सुरक्षित राहिली का? सीटवरून वाद, लोकलमध्ये कोयत्याने थरार! ठाकुर्लीजवळ प्रवाशावर जीवघेणा हल्ला; तिघे फरार

वैद्यकीय क्षेत्रात पोकळी

अत्यंत उमद्या व्यक्तिमत्त्वाचे डॉ. राठोड यांची मनमिळावू व खेळकर स्वभावाचे डॉक्टर म्हणून ख्याती होती. ते मोटिव्हेशनल स्पीकरही होते. अलीकडेच योगा डे निमित्त त्यांनी मानसिक तणाव दूर कसा करावा, यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले होते. रोटरीच्या चक्रधर या मुखपत्रातही त्यांनी मानसिक तणावावर लेख लिहिले होते. लातूर येथील दिवंगत हृदयरोग तज्ञ डॉ. ईश्वर राठोड हे ६ वर्षांपूर्वी २६ जून २०२० रोजी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी डॉ. मेहुल यांनी भरून काढली होती. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रियंका, आठ वर्षीय मुलगा व मातोश्री असा परिवार आहे. त्यांच्या मातोश्री जगन्नाथपुरी येथे गेल्या असल्याने त्या घरी नव्हत्या. या आकस्मिक घटनेची वार्ता लातूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

Web Title: The police have launched an investigation after dr mehul rathods body was found in a car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Latur news
  • maharashtra
  • Sucide

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.