Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील बेकायदा धंद्यांविरोधात धडक कारवायांना वेग दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 01:18 PM
वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील बेकायदा धंद्यांविरोधात धडक कारवायांना वेग दिला आहे. त्याच मोहिमेअंतर्गत टाकवे बुद्रुक येथे छापा टाकून पोलिसांनी १ किलो ५८८ ग्रॅम गांजा तसेच प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ९५ वर्षीय विठोबा नथु जांभुळकर (रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास टाकवे बुद्रुक गावातील आरोपीच्या शेतातील गोठ्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला १ किलो ५८८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत ३१ हजार ७६० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय ११ विमल पानमसाल्याची पाकिटे (किंमत २,१७८ रुपये) आणि ११ वि-१ तंबाखूची पाकिटे (किंमत २४२ रुपये) असा एकूण २,४२० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचाही साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३४ हजार १८० रुपये आहे.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन नंदकुमार देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक १९६/२०२६ दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब), २९ तसेच अन्न सुरक्षा अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(१), २६(२)(४) व ५९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

या कारवाईनंतर मावळ तालुक्यात बेकायदा अंमली पदार्थ व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. व्ही. गादेकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Web Title: The police have seized banned pan masala along with cannabis at takve budruk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.