सिया गोयलच्या वकिलाचा दावा काय?
आरोपी सिया गोयलचा वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, सियाच्या विरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस स्वतंत्र साक्षीदार नाही. सुरवातीला हा अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला गेला होता, मात्र नंतर पोलिसांनी हत्येच्या अँगलने तपास सुरू केला. भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम २३ नुसार, पोलिसांसमोर दिलेला कोणताही जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, जोपर्यंत तो मॅजिस्ट्रेटसमोर आणि पोलिसांच्या अनुपस्थितीत नोंदवला जात नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही.
Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
कायद्यानुसार, पोलिसांसमोर नोंदवलेले कोणतेही जबाब किंवा कबुली जोपर्यंत दंडाधिकाऱ्यांसमोर (Magistrate) अधिकृतपणे नोंदवली जात नाही, तोपर्यंत ती न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तसेच, सिया गोयल ही तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असून, २९ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत तिला न्यायालयीन कोठडी मिळण्यावर मुख्य भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
केतन अग्रवालच्या वडिलांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी या प्रकरणात वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. कुटुंबाच्या या विनंतीची दखल घेत, देशातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास मान्यता दिली आहे.
तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.
Ans: सियाविरोधात स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Ans: ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत.






