Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 दिवस, 25 कॅमेरे अन् हाती लागला आरोपी; शेवटच्या फोन कॉलने उलगडले तरुणाच्या खुनाचे गूढ

बीड बायपासलगत गांधेली शिवारात १५ जुलै रोजी झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ गुन्हे शाखेने उलगडले आहे. कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना मृताच्या शेवटच्या फोन कॉलचा धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 01:17 PM
12 दिवस, 25 कॅमेरे अन् हाती लागला आरोपी; शेवटच्या फोन कॉलने उलगडले तरुणाच्या खुनाचे गूढ

12 दिवस, 25 कॅमेरे अन् हाती लागला आरोपी; शेवटच्या फोन कॉलने उलगडले तरुणाच्या खुनाचे गूढ

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासलगत गांधेली शिवारात १५ जुलै रोजी झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ गुन्हे शाखेने उलगडले आहे. कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना मृताच्या शेवटच्या फोन कॉलचा धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि चौकशीच्या आधारे रिक्षाचालक शेख अनीस शेख अनीब (२६, रा. जुलेखा नगर, देवळाई) याला अटक केली आहे. गोरख अर्जुन राऊत (३५, रा. गेवराई, जि. बीड) याचा आईवरून शिवीगाळ झाल्याच्या वादातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

 

गोरखचा मृतदेह फाट्याजवळील झुडपात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर आघात झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी सिडको गांधेली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. तपासादरम्यान गोरखने कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवरून साधल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानंतर विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

१२ दिवस, २५ कॅमेरे; अन हाती लागला आरोपी

घटनास्थळी कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसल्याने तपास पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित होता. देवळाई चौक, झाल्टा फाटा, केंब्रिज चौक आणि परिसरातील २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तब्बल १२ दिवस तपासल्यानंतरच मयत रिक्षात बसल्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.

हे सुद्धा वाचा : कला शिक्षक भरतीवरून राज्यात तीव्र संताप; शासनाच्या तुटपुंज्या जागांवरून निलेश लंके अन् हेरंब कुलकर्णी आक्रमक

अनोळखीची भेट ठरली जीवघेणी

गोरख आणि आरोपीची यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती. झाल्टा फाट्यावर योगायोगाने दोघांची भेट झाली. त्यानंतर एकत्र मद्यपान करताना झालेल्या किरकोळ वादाने हिंसक रूप घेतले आणि काही क्षणांतच त्याचे पर्यवसान खुनात झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळावरून फारसे फॉरेन्सिक पुरावे मिळू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांना संपूर्ण तपास डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या आधारे करावा लागला.

हे सुद्धा वाचा : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

Web Title: The police have solved the murder of a young man in the gandheli area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.