Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. शेतातून पळून जाताना पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. तर दुसऱ्या आरोपीला जेजुरीच्या पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 12:14 PM
मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

सासवड : बोपगाव येथील कानिफनाथ मंदिराच्या रस्त्यावरील कमानी जवळ रस्त्यावरून जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान यातील आरोपीचे नाव दाखल होताच पोलिसांनी त्याची कुंडलीच काढली असता त्याच्यावर मोक्कासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याची गोपनीय माहिती मिळताच काही तासातच वाघापूर रस्त्यावर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी लक्ष्मण बालगुडे यांनी ६ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास बोपगाव गावच्या चौकात कानिफनाथ कमानीलगत सासवड- बोपगाव जाणाऱ्या रस्त्यावर हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या मोटार सायकलला दुचाकी आडवी लावली. तसेच हाताने व लाथाबक्क्यांनी मारहाण करुन आरोपी गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट याने हातामध्ये दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. आरोपी गणेश नवनाथ कामथे व प्रसाद मारुती कामथे यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे लक्ष्मण शिवाजी बालगुडे (वय ३२ रा. मुर्टी, ता. बारामती) यांनी सासवड पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट (रा. पिंपळे) गणेश नवनाथ कामथे आणि प्रसाद मारुती कामथे (दोघे रा.चांबळी ता. पुरंदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होळकर यांच्याकडे तपास देण्यात आला.

दरम्यान यातील मुख्य आरोपी गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट याची पोलिसांनी कुंडली बाहेर काढताच तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मार्च २०२६ मध्येच अल्पयीन मुलीचे अपहरण करून बळजबरीने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तसेच गेल्या तीन महिन्यापासून फरारी होता. तो वारंवार आपले लोकशन बदलुन वेगवेगळया ठिकाणी राहत असल्यामुळे त्याला पकडणे अवघड झाले होते. तो फरार असताना त्याने सासवड पोलीस स्टेशन हददीत वेगवेगळे गुन्हे केल्याने वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल केले होते.

दरम्यान आरोपी गोट्या उर्फ अक्षय खेनट वाघापूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस शिपाई सचिन किवळे, तुषार लोंढे, प्रविण शेंडे यांच्या पथकाने वाघापूर रस्त्यावर सापळा लावला.

त्यावेळी तो त्याच्या सहकाऱ्यासोबत वाघापूर रस्त्यावर पोलिसांच्या गाडी समोरच काही अंतरावर दिसताच पोलिसांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गाडीचा वेग वाढवीताच त्याने दुचाकी सोडून शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला त्याच अवस्थेत पाठलाग करून पकडले. तर दुसऱ्या आरोपीला जेजुरीच्या पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : सासवडमध्ये ‘एफडीए’ची मोठी कारवाई; गुटखा विक्रीचे दुकान सील

दरम्यान आरोपीला ताब्यात घेवून अटक केली असता त्याने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत एक गुन्हा, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दोन गुन्हे, राजगड पोलीस स्टेशन हद्दीत एक गुन्हा तसेच सासवड पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे केल्याची माहिती दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.

Web Title: The saswad police have arrested an accused person who had fled after committing serious crimes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Saswad Crime

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.