Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

हिमाचल प्रदेशात खून केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या चार आरोपींच्या पलायनाला जळगावातच ब्रेक लागला आहे. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवून चौघांना ताब्यात घेतले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2026 | 12:08 PM
हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण...; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण...; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

जळगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता हिमाचल प्रदेशात खून केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या चार आरोपींच्या पलायनाला जळगावातच ब्रेक लागला आहे. प्रवासासाठी पैसे संपल्याने मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरलेल्या आरोपींचे लोकेशन हिमाचल प्रदेश पोलिसांनी जळगाव पोलिसांना कळविले. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवून चौघांना ताब्यात घेतले.

 

हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दि. ३० सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश कुमार व आरोपी एकत्र दारू पीत असताना बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हल्ला करून मुकेश कुमार यांचा खून केल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी दिली.

घटनेनंतर आरोपी सकाळी सुमारे ११ वाजता किसंपूर येथून निघाले. अंबाला येथे पोहोचल्यानंतर दुपारी ४.३० वाजता मुंबई एक्स्प्रेस पकडून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, प्रवासात खायलाही काही घेण्यासाठीही पैसे संपल्याने मोबाईल विकून पैसे उभे करण्यासाठी ते जळगावात उतरले. याचदरम्यान त्यांचे लोकेशन पोलिसांना मिळाले. हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना आरोपी शनिपेठ हद्दीत असल्याची माहिती दिली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने सूचना देत शोधमोहीम राबविली. हालचालींचा माग काढत पथकाने चौघांना ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : मोठे प्रकल्प होतील पण मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज; अमोल बालवडकर यांची नवभारत कार्यालयात भूमिका

चौघेही आरोपी बिहारचे

ताब्यात घेतलेल्यांमध्ये चंदन कुमार व रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जि. मुझफ्फरपूर), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे. चौघांना ताब्यात घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया हिमाचल पोलिसांच्या ताब्यात आरोपी दिल्यानंतर होणार आहे.

हे सुद्धा वाचा : पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Web Title: The shanipeth police have arrested four individuals in connection with a murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
2

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
3

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…
4

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.