Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने एका ICICI बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजरला टेलिग्रामवर फसवण्यात आले. NSE च्या नावाने ₹२६.७३ लाखांची फसवणूक झाली असून, सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 14, 2025 | 03:20 PM
ICICI बँकेतील महिला अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी गंडवले (Photo Credit - X)

ICICI बँकेतील महिला अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी गंडवले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • नोकरीच्या आमिषाचा टेलिग्राम सापळा!
  • २६ लाखांवर फसवणूक
  • ICICI बँकेतील महिला अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी गंडवले
Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud Marathi News: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) नावाने पार्टटाईम नोकरी आणि जादा उत्पन्नाचे आमिष दाखवून एका नामांकित बँकेतील महिला अधिकाऱ्याला टेलिग्रामच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आले. अज्ञात सायबर चोरट्यांनी या महिला अधिकाऱ्याची तब्बल २६ लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. हा धक्कादायक प्रकार २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान एन-११ सुदर्शननगरात घडला.

फसवणुकीची नेमकी पद्धत

एन-११, सुदर्शननगर, टीव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या दीपाली विजय कोलते (२८) या आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दीपाली कोलते यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) एचआर विभागाच्या नावाने मॅसेज आला आणि त्यांना टेलिग्राम ॲपवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. टेलिग्रामवर ‘रंजिता विजयवर्गिया’ नावाच्या अकाऊंटवरून पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली. विश्वास बसावा म्हणून एनएसई ऑफिसचे फोटो, लेटरपॅड व कंपनीची माहितीही पाठविण्यात आली.

पहिले टास्क आणि पेमेंट

पहिल्या दिवशी हॉटेलच्या फोटोंना ५ स्टार रेटिंग देण्याचे २० टास्क देण्यात आले. ते पूर्ण केल्यावर ₹२०० मानधन थेट बँक खात्यात जमा झाल्याने फिर्यादीचा विश्वास वाढला. दुसऱ्या दिवशी पुन्हा टास्क देण्यात आले. तिसऱ्या टास्कच्या वेळी ₹८०० भरल्यास ३० टक्के कमिशन मिळेल, असे सांगण्यात आले. क्यूआर कोडवर रक्कम भरल्यानंतर एनएसई लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले. त्यानंतर ‘विकास यादव’ या अकाऊंटवरून गोल्ड परचेस ट्रेडिंगचे टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर ‘अपेक्षा पांडे’ या अकाऊंटवरून सेटलमेंट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

हे देखील वाचा: Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव

‘एरर’ दाखवून पैसे काढले

हळूहळू टास्कच्या नावाखाली ₹१ हजार, ₹२ हजार, ₹१० हजार, ₹५० हजार रुपयांची मागणी सुरू झाली. टास्क चुकला, सिस्टम एरर झाली, ग्रुपमधील इतर मेंबरमुळे अडचण आली अशी कारणे देत पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. ‘८८५५३’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून इतरांनीही रक्कम भरल्याचे भासवण्यात आले. या काळात फिर्यादीकडून आयसीआयसीआय, इंडियन बँक, आयडीबीआय, ॲक्सिस, पंजाब ग्रामीण, येस बँक आदी विविध बँक खात्यांवर क्यूआर कोड, आरटीजीएस व ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम पाठविण्यात आली.

‘अकाऊंट फ्रीज’चे नाटक

पैसे परत मिळतील या अपेक्षेने, प्रत्येक टास्कनंतर “तुमचे गोल्ड अकाऊंट फ्रीज झाले आहे, अनफ्रीजसाठी आणखी रक्कम भरा” असे सांगण्यात आले. शेवटी १२ लाख रुपये भरल्यानंतरही नव्या टास्कच्या नावाखाली पैशांची मागणी झाली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

गुन्हा दाखल

२४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सायबर चोरट्यांनी फिर्यादीची एकूण ₹२६ लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी फिर्यादीने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली, त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

Web Title: The trading scam in the name of nse a bank official was defrauded of 26 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • cyber crime

संबंधित बातम्या

Drugs Case : अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; सहभाग कोणा-कोणाचा? तपास सुरू
1

Drugs Case : अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; सहभाग कोणा-कोणाचा? तपास सुरू

ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?
2

ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले
3

Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
4

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.