बिहार: बिहारच्या पाटणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुनेनेच आपल्या सासऱ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आली. या घटनने संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी सून राणी कुमारी, तिची बहीण, दाजी आणि भावासोबत हा कट त्यांनी रचल्याचे उघडकीस आले आहे. या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…
काय घडलं नेमकं?
मोहनपूर पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी आढळून आला होता. याची माहिती पुनपुन पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना बरेच महत्वाचे पुरावे सापडले. या पुराव्यांच्या आधारे, मृत व्यक्तीच्या सुनेनेच हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी केवळ चार दिवसातच हत्येत सहभागी असलेल्या चारही आरोपींना अटक केली.
का केली हत्या?
आरोपी सुनेचे नाव राणी आहे. राणीच्या पतीने दोन लग्न केली होती. राणीचे सासरे हे मुलाच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना जास्त महत्व देत असे. यामुळे त्यांना प्रॉपर्टीमधील हिस्सा देण्याचं तिच्या सासऱ्यांनी सांगितलं होतं. आरोपी महिलेला याच गोष्टीचा प्रचंड राग यायचा आणि त्यावेळी तिने आपल्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट रचला.
राणीने तिची बहीण पूनम देवी, तिचा दाजी आणि भावासोबत मिळून सासऱ्याची हत्या केली. कोणाला ओळख पटू नये म्हणून सासऱ्याचा मृतदेह मोहनपूर पुलाजवळ फेकून दिला. पोलिसांनी सगळ्या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात असून पुढील तपास करत आहे.न
बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…; नेमकं प्रकरण काय?
बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका मध्यमवयीन व्यक्तीच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. मांझी नगर पंचायतीतील दक्षिण टोला येथील रहिवासी ५५ वर्षीय सूरज प्रसाद यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. त्यांचा मृतदेह मांझी दक्षिण टोला येथील त्यांच्या खोलीत बेडखाली रक्ताने माखलेला आढळला. गुन्हेगारांनी त्यांचे दोन्ही डोळे बाहेर काढले आणि त्यांचे गुप्तांग चिरडले होते.
या घटनेची माहिती मिळताच मृताची पत्नी, दोन मुले आणि तीन मुली मांझी येथे घटनास्थळी पोहोचले. मृताचा पुतण्या पंकज प्रसाद यांनी सांगितले की, सूरज प्रसाद गावाबाहेरील बागेत एका लहान खोलीत सुमारे दहा वर्षांपासून एकटाच राहत होता. त्याच्या कुटुंबातील सदस्य छपरा शहरात राहतात आणि उदरनिर्वाह करतात. बुधवारी (१० डिसेंबर २०२५) सकाळी, जेव्हा शेजारचे कुटुंबातील सदस्य त्यांना जेवण देण्यासाठी आले तेव्हा त्यांना खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि त्यांना काहीतरी गडबड असल्याची भीती वाटली. आत प्रवेश केल्यावर त्यांना सूरज प्रसादचा मृतदेह बेडखाली पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. या घटनेची तात्काळ मांझी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कुटुंबाला संशय आहे की ही हत्या रात्रीच्या वेळी झाली असावी. सारणचे एसएसपी डॉ. कुमार आशिष म्हणाले की, पोलीस तपास करत आहेत आणि लवकरच मारेकऱ्यांना पकडले जाईल.
Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब
Ans: प्रॉपर्टीतील वाटपावरून झालेल्या वादामुळे.
Ans: सून राणी कुमारी व तिचे तीन नातेवाईक.
Ans: चौकशी सुरू असून अधिक तपास केला जात आहे.






