Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या सराफी दुकानात घुसून लुट; तब्बल…

भरदुपारी सराफी दुकानात घुसून चोरट्यांनी लुटापाट करत चोरी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2025 | 01:16 PM
पुण्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या सराफी दुकानात घुसून लुट; तब्बल...

पुण्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या सराफी दुकानात घुसून लुट; तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : चंदननगर पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारांनी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी सराफी दुकानात घुसून चोरट्यांनी लुटापाट करत चोरी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली. गृहमंत्री पुण्यात अन् पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असताना हा प्रकार घडल्याने पोलिस दलातही चांगलेच वातावरण गरमागरम झाले होते. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्यारे दाखवत तीन ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात राजेंद्रसिंग देवडा (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात साईनाथनगर हा व्यापारी परिसर आहे. मुख्य रस्त्यावरच देवडा यांचे ‘श्री आशापुरी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारास ते दुकानाच्या काऊंटरवर बसले होते. तेव्हा दुचाकीवरून चेहऱ्याला मास्क लावून तिघेजन दुकानात शिरले. त्यांनी थेट तीक्ष्ण हत्यारे दाखवत लुटपाट सुरू केली. त्यांनी या गोंधळात तीन ग्रॅमच्या तीन वेगवेगळ्या कानात घालायच्या बाळ्या हाती लागल्या. देवडा यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरडा सुरू केला. त्यांनी स्टुल अंगावर फेकत मोठ्या आरडाओरडा केल्याने चोरटे घाबरले. ते पळत बाहेर आले आणि दुचाकीवरून पसार झाले. आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी धावपळ सुरू केली. चोरट्यांचा पाठलाग देखील केला. मात्र, दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

गजबजलेल्या परिसरात भरदुपारचा थरार

साईनाथनगर परिसर हा सतत गजबजलेला असतो. मुख्य रस्ता आणि या दुकानासमोरूनच पुर्ण रहदारी देखील असते. ही रहदारी मोठी असते. त्यामुळे सहसा वाहने चालविताना देखील वेग कमी असावा लागतो. परंतु, त्याही स्थितीत चोरट्यांनी ही लुट केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि काही तासांनीच त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा टाकला. तेथून जास्त सोने गेले नसले किंवा पिस्तुल दाखवून धमकावले नसले तरी भरदिवसा दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: There has been an incident in pune where thieves broke into a jewelry shop in broad daylight and stole it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Cases

संबंधित बातम्या

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ
1

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…
2

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
3

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…
4

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.