Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात रूममेटवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळ्यावर सपासप वार केले अन्…

शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात त्याचा चाकूने गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नर्‍हे परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2025 | 02:19 PM
पुण्यात रूममेटवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळ्यावर सपासप वार केले अन्...

पुण्यात रूममेटवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळ्यावर सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात त्याचा चाकूने गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नर्‍हे परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पवार (रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हल्ल्यात अर्जुन राय रियांग हा गंभीर जखमी झाला आहे. सचिन मधुकर खांबल (40, रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, नर्‍हे) यांनी तक्रार दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०२४ पासून सचिन खांबल हे महेश पवार आणि अर्जुन राय रियांग हे सोबत राहतात. अर्जुन आणि फिर्यादी हॉस्टेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करतात. तर महेश पवार हा त्याच ठिकाणी वॉचमेनचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होतात. अर्जुन हा महेशला आई बहिणीवरून शिवीगाळ करत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता. महेश हा अर्जुनला तू बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहेस, तू आम्हाला जगायला शिकवतोस का ? अशा बोलण्यावरूनही त्याच्यात वाद होत होते.

दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सचिन हे रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला. महेशला बाजूला ढकलून देत सचिनने बाजूच्या मित्रांना ओरडून बोलवले. तोपर्यंत महेश तेथून पळून गेला. सचिन यांनी तात्काळ अ‍ॅम्बुलन्सला बोलवून अर्जुनला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत.

Web Title: There has been an incident of a knife attack on a person in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.