Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील यादी पाहण्यावरून झालेल्या वादातून पुणा कॉलेजमध्ये एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2025 | 01:05 PM
कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेतील यादी पाहण्यावरून झालेल्या वादातून पुणा कॉलेजमध्ये एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी काहीजण ओळखीचे असून दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे. ही घटना ३० जून रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन करणुल (वय ३१, रा. युनिटी पार्क, मलिकनगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांचा भाचा पुणा कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्जदार होता. प्रवेश यादी नुकतीच जाहिर झाली. ती यादी पाहण्यासाठी तक्रारदारांचा भाचा गेला होता. तेव्हा यादी पाहताना त्यांच्यात वादविवाद झाले. यानंतर वाद अधिक तीव्र होऊन काही जणांनी कॉलेजच्या आवारात तसेच बाहेर तक्रारदार व त्यांच्या भाच्यावर हाताने, पायाने व लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण केली. हल्ल्यात तक्रारदार जखमी झाले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : भरदुपारी अल्पवयीन मुलाचा हात मनगटापासून कापला! रक्तरंजित हल्ल्याने परिसरात तणाव

पुण्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत

वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: There has been an incident of a young man being brutally beaten up in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया
1

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या
2

पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला
3

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर
4

मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.