Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरट्यांची पण कमालच! कुटूंबिय घरात असताना तिजोरीच पळविली

हडपसर भागात कुटूंबिय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी एका बेडरूममधील २३ लाख ४३ हजारांच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह तिजोरी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2025 | 05:50 PM
चोरट्यांची पण कमालच! कुटूंबिय घरात असताना तिजोरीच पळविली

चोरट्यांची पण कमालच! कुटूंबिय घरात असताना तिजोरीच पळविली

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून, हडपसर भागात कुटूंबिय घरात झोपलेले असताना देखील एका बेडरूममधील २३ लाख ४३ हजारांच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह तिजोरी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत संशयित चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पार्थ गौंडा पाटील (वय ४४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पार्थ पाटील यांचा मगरपट्टा येथील नॉर्थ एच १०२ येथे बंगला आहे. ते कुटूंबियासह येथे राहतात. दरम्यान, ते एका बेडरूममध्ये झोपले होते. तर, दुसऱ्या मजल्यावर चोरीला गेलेली लोखंडी तिजोरी ठेवलेली होती. दरम्यान, बेडरूममध्ये शिरण्यासाठी खिडकीवरून जाता येते. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. खिडकीवरून चोरटा आत शिरला. बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरी उचलून तो पसार झाला. हा प्रकार तक्रारदारांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाहणीकरून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यात संशयित कैद झाला असून, त्यानूसार त्याचा शोध घेतला जात आहे.

तर, खराडी परिसरात एका कंपनीतून चोरट्यांनी साडे तीन लाखांचे वायर चोरून नेले आहेत. झेन वन बिल्डींगच्या शेजारी इलेक्ट्रीक कंपनीतून साडे तीन लाखांचे कॉपर वायर चोरून पोबारा केला. याप्रकरणी खराडी पोलिसांत विनय गाडगीळ (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोदंवला आहे. हा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. कंपनीकडून रविवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: There has been an incident of thieves breaking into a house and stealing in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
3

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
4

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.