Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल लंपास

दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि पुराव्यासाठी महत्त्वाचा असलेला डीव्हीआर चोरून नेला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 12:28 PM
रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल लंपास

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात चोरीच्या घटना वाढल्या
  • रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले
  • शटर उचकटून मुद्देमाल लंपास
रत्नागिरी : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घाचतला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स दुकान चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि पुराव्यासाठी महत्त्वाचा असलेला डीव्हीआर चोरून नेला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

 

सुमित्रा ज्वेलर्सचे मालक किशोर महादेव देवरूखकर (वय ६३, रा. राजेंद्रनगर) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते. रविवारची सुट्टी असल्याने दुकान बंदच होते. सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करीत दुकानातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदीचे पैंजण सुमारे १ लाख रुपये किमतीचे (१०५० ग्रॅम), चांदीचे ताम्हण ५० हजार रुपये किमतीचे (३१० ग्रॅम), चांदीचे छल्ले २० हजार रुपये किमतीचे (२०० ग्रॅम) या सामानाची चोरी झाली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ५ हजार रुपये किमतीचा हिकव्हीजन कंपनीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवून नेला आहे. याप्रकरणी किशोर देवरूखकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

पुराव्यासाठी डीव्हीआर पळवला

चोरटे अत्यंत सराईत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. आपली ओळख पटू नये आणि चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये, या हेतूने चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज रेकॉर्ड होणारा डीव्हीआर सोबत नेला. मारुती मंदिर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: There has been an incident of thieves breaking into a jewelers shop and stealing in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • crime news
  • Gold Theft
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
1

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप
2

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
3

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
4

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.