Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mobile Snatching Case: पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन मोबाइल आणि एक दुचाकी, असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 29, 2025 | 02:19 PM
मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या (Photo Credit - X)

मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मौजमजेसाठी हिसकावयाचा मोबाईल
  • आईने घेतलेल्या नव्या दुचाकीवरून चोरी
  • दोघा तरुणांना अटक, १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगमध्ये मौजमजेसाठी आणि जास्तीचे पैसे मिळावेत या हव्यासापोटी दुचाकीवरून मोबाइल हिसकावणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या जव्हारनगर पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन मोबाइल आणि एक दुचाकी, असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गुरुवारी सुतगिरणी चौक परिसरात विजय अशोक पवार हे आपल्या मित्राची वाट पाहत उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाइल जोरात हिसकावून पळ काढला. या प्रकरणी जव्हारनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सापळा रचून अटक

गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि विजय सुरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोबाइल हिसकावणारे चोरटे बीडबायपास परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली. संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सुतगिरणी चौकातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली.

हे देखील वाचा: Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

आरोपींची माहिती

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. विशाल विठ्ठल तुपे (वय २१, रा. अमेरनगर, बीडबायपास): विशाल हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. २. आबिद अनिस पटेल (वय १८, रा. अन्नार कॉलनी, रेल्वे स्थानक परिसर): आबिद हा मजुरी काम करतो. दोघेही आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील असून केवळ अधिकच्या पैशांच्या हव्यासापोटी ते गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांचे आवाहन

पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित

Web Title: They became mobile phone thieves for fun jawharnagar police arrested two people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Ajanta Forest Tree Cutting: अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! अवैध वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास; वनविभागाचे लक्ष्य कुठे?
1

Ajanta Forest Tree Cutting: अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! अवैध वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास; वनविभागाचे लक्ष्य कुठे?

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा
2

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य
3

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आज; 31 केंद्रांवर विद्यार्थी देणार परीक्षा
4

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आज; 31 केंद्रांवर विद्यार्थी देणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.